Bharatiya Genius

भारतीय जिनियस - डॉ जयंत नारळीकर

भारतीय जिनियस - डॉ जयंत नारळीकर

एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विश्‍ववैज्ञानिक हा एक लेखक कसा बनतो याची गोष्ट खूपच विलक्षण आहे. १९७४ साली नववं मराठी विज्ञान साहित्य संमेलन आयोजित केलं होतं, त्यातल्या विज्ञानरंजन स्पर्धेत या खगोलशास्त्रज्ञ महाशयांनी भाग घेतला होता. त्यांची नावाची आद्याक्षरे ‘जविना’ अशी होती. त्यांनी ती उलटी ‘नाविज’ अशी करून नारायण विनायक जगताप असं एक टोपणनाव स्वतःसाठी निवडलं आणि ‘कृष्णविवर’ नावाची कथा लिहून ती या स्पर्धेसाठी पाठवली. गंमत म्हणजे या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं. विज्ञानकथा या उपेक्षित वाडमयप्रकाराला त्यांनी जनमानसात दर्जा मिळवून दिला. त्यांनतर लोक आवडीनं विज्ञानकथा वाचायला लागले. पुढे वाचा

भारतीय जीनियस - भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया

भारतीय जीनियस - भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया

आज १५ सप्टेंबर - हा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो! विश्‍वेश्‍वरैयांच्या जन्मदिवसाचं औचित्त्य साधून त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि पुढल्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करत राहावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया यांना ‘भारताचा आधुनिक भगीरथ’ असं म्हटलं जातं. विश्‍वेश्‍वरैयांचं काम संपूर्ण भारतभर आणि तेही अनेक क्षेत्रातलं! अल्बर्ट आईन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञालाही विश्‍वेश्‍वरैयांबद्दल कौतुक आणि प्रचंड आदर वाटायचा. पुढे वाचा

भारतीय जीनियस मेघनाद साहा

भारतीय जीनियस मेघनाद साहा

मेघनाद साहा हे सुप्रसिद्ध भारतीय खगोलवैज्ञानिक (ऍस्ट्रोफिजिसिस्ट) होते. ‘साहा समीकरण’ या त्यांच्या समीकरणामुळे ते प्रसिद्ध झाले. हे समीकरण तार्‍यांमधली भौतिक आणि रासायनिक स्थिती यांची व्याख्या करतं. स्वप्न आणि कृतीशीलता यांचा अचूक मेळ घालणारा संशोधक कोण तर केवळ मेघनाद साहा या भारतीय वैज्ञानिकाचच नाव घ्यावं लागेल. मेघनाद साहा यांचं विज्ञानाबरोबरच अनेक शाखांमधलं काम आज बघितलं तर थक्क व्हायला होतं. त्या वेळी खगोलभौतिकीवर काम करणार्‍यांना नोबेल पारितोषिक दिलं जात नसलं तरी मेघनाद साहा यांचं नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवलं गेलं हेातं. पुढे वाचा

'भारतीय जीनियस' येती घरा | तोचि दिवाळी दसरा || लॉरी बेकर

'भारतीय जीनियस' येती घरा | तोचि दिवाळी दसरा || लॉरी बेकर

'भारतीय जीनियस' येती घरा |
तोचि दिवाळी दसरा || 
गरिबांचा विचार करणारा, गरिबांसाठी झटणारा, पर्यावरणाचा विचार करणारा आणि निसर्गाला बरोबरीनं घेऊन चालणारा भारतीय जीनियस वास्तुशिल्पी कोण असा प्रश्‍न केला तर एकच नाव डोळ्यासमोर येईल ते म्हणजे - लॉरी बेकर ! ‘वास्तुशास्त्रातले गांधी’ ही लॉरी बेकरची खरी ओळख! गरिबांसाठी अतिशय किफायतशीर दरात घर बांधून देणारा वास्तुशिल्पी असं देखील त्यांना म्हटलं जातं. आपलं काम हे प्रोफेशन म्हणून न करता पॅशन म्हणून करणारा हा अवलिया! लॉरी बेकर यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’सह अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार मिळाले.  पुढे वाचा

भारतीय जिनियस

भारतीय जिनियस

७ नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘जीनियस’ मालिकेतल्या आम्ही लिहिलेल्या पहिल्या १२ पुस्तिकांचं प्रकाशन मनोविकास प्रकाशनतर्फे पुण्यात झालं. त्यापूर्वी ‘जीनियस’ प्रकल्पाविषयी थोडक्यात! आमच्या मनात अनेक वर्षांपासून तीन प्रकल्प घोळत होते. पहिला होता ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’, दुसरा होता ‘आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड’ आणि तिसरा होता ‘बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड’! यातला पहिला प्रकल्प ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’ म्हणजे ज्यांनी जग बदलवलं किंवा जगावर प्रभाव टाकला, अशी माणसं. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ, क्रांतिकारक असे सगळे होते. पुढे वाचा

भारतीय जीनियस - सर सी. व्ही. रामन 

भारतीय जीनियस - सर सी. व्ही. रामन 

सर सी. व्ही. रामन या झपाटलेल्या संशोधकानं संपूर्ण आयुष्य विज्ञानाच्या क्षेत्रातल्या संशोधनाला दिलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४५० शोधनिबंध लिहिले. वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर पाच दीर्घ लेख (मोनोग्राफ) लिहिले. क्वॉंटम मेकॅनिक्स, किरणोत्सर्गता, स्फटिकांचं रसायनशास्त्र, खनिजद्रव्यांचं शास्त्र, प्राणिशास्त्र, श्रवणशास्त्र अशा किती वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी संशोधन केलं. तसंच केवळ विज्ञानावर त्यांनी ४००० पानं लिहून ती प्रसिद्ध केली. एकूण १५०० प्रबंध प्रकाशित करणार्‍या रामन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाचा कामाचा झपाटा आणि वेग किती प्रचंड असला पाहिजे याची कल्पनाच केलेली बरी! पुढे वाचा

भारतीय जीनियस प्रास्ताविक

भारतीय जीनियस प्रास्ताविक

७ नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘जीनियस’ मालिकेतल्या आम्ही लिहिलेल्या पहिल्या १२ पुस्तिकांचं प्रकाशन मनोविकास प्रकाशनतर्फे पुण्यात झालं. त्यापूर्वी ‘जीनियस’ प्रकल्पाविषयी थोडक्यात! आमच्या मनात अनेक वर्षांपासून तीन प्रकल्प घोळत होते. पहिला होता ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’, दुसरा होता ‘आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड’ आणि तिसरा होता ‘बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड’! यातला पहिला प्रकल्प ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’ म्हणजे ज्यांनी जग बदलवलं किंवा जगावर प्रभाव टाकला, अशी माणसं. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ, क्रांतिकारक असे सगळे होते. पुढे वाचा

भारतीय जीनियस -- डॉ. होमी जहॉंगीर भाभा

भारतीय जीनियस -- डॉ. होमी जहॉंगीर भाभा

३० ऑक्टोबर १९०९ या दिवशी एका कुटुंबात एक बाळ जन्मलं. एकदा काय झालं, एका रात्री ते बाळ जोरजोरात रडायला लागलं. त्याला झोपवण्यासाठी मग वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. पण ते कशालाच दाद देईना. त्याला काही त्रास होतोय का हेही मग घरातल्या जाणत्या स्त्रियांनी बघण्याचा प्रयत्न केला. पण तशीही काही लक्षणं दिसेनात. रात्रभर आपल्या रडण्यानं घर दणाणून सोडणार्‍या बाळाला शांत कसं करावं हे कोणालाच कळत नव्हतं. पाळण्याला झोके देऊन झाले, खेळणी दाखवण्यात आली, वेगवेगळे आवाज काढण्यात आले, बाळाला कडेवर घेऊन उगी उगी करण्यात आलं, पण छे! कशाचाच उपयोग होत नव्हता. अखेर डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. पुढे वाचा

कोसंबी - भारतीय जीनियस

कोसंबी - भारतीय जीनियस

ए. आर. जी. ओवेन या प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञानं, 'कोसंबीसारखे विद्वान 'कोसंबी फॉर्म्युला' करून उंच भरारी तर घेतात, पण भरकटत नाहीत.’ असं गौरवानं म्हटलं होतं. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख - आम्ही आपल्यासाठी आणत आहोत, १२ भारतीय जीनियसपैकी डी. डी. कोसंबी यांची अनमोल भेट!!!! दामोदर धर्मानंद कोसंबी! स्वतंत्र भारतातल्या वैज्ञानिक संशोधनाची मुहूर्तमेढ रोवणारा एक वैज्ञानिक, गणिती आणि पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांना अख्खं जग ओळखतं. विशुद्ध (प्युअर) गणितातलं त्यांचं योगदान खूपच महत्त्वाचं असून सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स) यातही त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. पुढे वाचा