भारतीय जिनियस
७ नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘जीनियस’ मालिकेतल्या आम्ही लिहिलेल्या पहिल्या १२ पुस्तिकांचं प्रकाशन मनोविकास प्रकाशनतर्फे पुण्यात झालं. त्यापूर्वी ‘जीनियस’ प्रकल्पाविषयी थोडक्यात! आमच्या मनात अनेक वर्षांपासून तीन प्रकल्प घोळत होते. पहिला होता ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’, दुसरा होता ‘आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड’ आणि तिसरा होता ‘बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड’! यातला पहिला प्रकल्प ‘पीपल हू चेंज द वर्ल्ड’ म्हणजे ज्यांनी जग बदलवलं किंवा जगावर प्रभाव टाकला, अशी माणसं. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ, क्रांतिकारक असे सगळे होते. दुसरा प्रकल्प म्हणजे ज्यांनी जग बदललं अशा संकल्पना (लोकशाही,स्त्रीवाद, सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण, केऑस, भांडवलशाही, साम्यवाद वगैरे) आणि तिसरा म्हणजे भगवद्गीता, बायबल, प्रिन्सिपिया, दास कॅपिटल, ओरिजिन ऑफ स्पिशीज, सेल्फिश जीन, वेल्थ ऑफ नेशन्स, इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स वगैरे अशा ज्या पुस्तकांनी जगावर प्रचंड प्रभाव पडला, अशी पुस्तकं.
आमचं या आधीचं ‘कॅनव्हास’ हे चित्र-शिल्प कलेवरचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं होतं. मग आम्ही अशा जग बदलवणार्या माणसांची नावं काढायला सुरुवात केली. बघता बघता ही यादी १२५ च्याही वर जाऊन पोहोचली. यातल्या प्रत्येकांवर ६०-७० पानी पुस्तिका काढायचं ठरलं. पण इतक्या पुस्तिका काढणं आम्हाला आमच्या इतर प्रकल्पांबरोबर शक्यच झालं नसतं. मग आम्ही ही यादी संक्षिप्त केली. तरीही ही यादी ७२ इतकी झालीच. मग आम्ही दर सहा महिन्याला किंवा वर्षाला १२ लोकांवर १२ पुस्तिका काढू असं ठरवलं. त्यांच्या कार्याप्रमाणे प्रमाणे त्यांचं वर्गीकरणही केलं. सुरुवातीला आम्ही जगप्रसिद्ध असे १२ विदेशी शास्त्रज्ञ निवडले. गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, रॉबर्ट कॉख, एडवर्ड जेन्नर, अॅलेक्झांडर फ्लेमिंग, लुई पाश्चर, मेरी क्युरी, लीझ माइट्नर, रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन अशी ही एकाहून एक सरस अशी १२ जीनियस मंडळी होती. त्यांची नावं उच्चारताक्षणी आमच्या मनात या मालिकेचं नाव ‘जीनियस’ हे निश्चित झालं.
आधुनिक विज्ञानाचा जनक म्हटला जाणारा गॅलिलिओ याला केवळ खरं बोलल्यामुळे आय्ाुष्यभर प्रचंड छळाला सामोरं जावं लागलं, न्य्ाूटनचे गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध पण त्याचबरोबर त्याचा विक्षिप्त स्वभाव, आईन्स्टाईनच्या य्ाुगप्रवर्तक संशोधनाबरोबरच त्याच्या आय्ाुष्यातला संघर्ष आणि मिश्कीलपणा, स्टीफन हॉकिंगचं आपल्या असाध्य अशा अपंगात्वर मात करत केलेलं संशोधन, देवीच्या रोगामुळे आख्ख्या जगावर मृत्य्ाूकळा असताना देवीची लस शोधून लाखो/करोंडोंचे प्राण वाचवणारा जेन्नर, पेनिसिलीनचा शोध लावणारा फ्लेमिंग आणि त्याचे सहकारी, सूक्ष्मजंतूंचं आपल्या आय्ाुष्यात होणारं अतिक्रमण सूक्ष्मदर्शक वापरून सांगणारा आणि ते अतिक्रमण थांबवणारा निसर्गपे्रमी कॉख, पिसाळलेल्या कुत्र्यावरची रेबीज लस असो वा पाश्चरायझेशन यातल्या संशोधनाबरोबरच प्रेम कसं करावं याच्या य्ाुक्त्या सांगणारा लुई पाश्चर, दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी आणि संपूर्ण आय्ाुष्य प्रतिकूल परिस्थितीत जगून अणुविज्ञानात संशोधन करणारी मेरी क्य्ाुरी, ाी असल्याचं दुय्यमत्व सहन करत संशोधनालाच आपली कर्मभूमी समजणारी आणि आय्ाुष्यभर प्रतिकूल परिस्थितीशी झगडणारी लीझ माईट्नर, अॅटमबॉम्बचा जनक संबोधला जाणारा आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर बेचैन झालेला ओपेनहायमर, अतिशय बुद्धिमान गणिती, वैज्ञानिक आणि तरीही प्रेम कसं करावं हे शिकवणारा मानवतावादी फाईनमन अशी ही मंडळी पहिल्या भागातल्या ‘जीनियस’मध्ये आम्हाला जिवाला चटका लावून गेली. आमच्या सान्निध्यात राहून त्यांनी आमचं जगणं आणखी समृद्ध केलं.
‘जीनियस’च्या पहिल्याच मालिकेला शाळा आणि महाविद्यालयं इथले विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचक या सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ही १२ शााज्ञ मंडळी आवडल्याचे हजारो मेल्स, पत्रं आणि फोन्स आम्हाला आले. पिंपरी-चिंचवड इथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात तर जीनियसनं सर्वाधिक विक्रीच्या पुस्तकांच्या सर्व्हेक्षणामध्ये पहिल्या दहात स्थान मिळवलं.
‘जीनियस’ च्या पहिल्या १२ पुस्तिका वाचल्यानंतर या मालिकेतले पुढले ‘जीनियस’ आम्हाला कधी वाचायला मिळणार अशी विचारणा वाचकांकडून वारंवार होऊ लागल्यावर आम्ही दुसर्या टप्प्यातले १२ शााज्ञ/तंत्रज्ञ हे भारतीय निवडले. यात आर्यभट/ भास्कराचार्य असे प्राचीन भारतीय, जगदीशचंद्र बोस, विश्वेश्वरैया, मेघनाद साहा, रामानुजन, सी. व्ही. रामन, डी. डी. कोसंबी, होमी भाभा, चंद्रशेखर, एम. एस. स्वामीनाथन, लॉरी बेकर आणि डॉ. जयंत नारळीकर असे सामील झाले. प्रत्येकाचे शोध वेगळे आणि आय्ाुष्यातले चढउतार वेगळे. प्रत्येकाच्या संशोधनाचा प्रांत वेगळा आणि प्रदेशही वेगळा! तरीही प्रत्येकामधलं भारतीयत्व त्याच्या कामात ठळकपणे उठून दिसत होतं. यात आर्यभट, भास्कराचार्य, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, माधवा या प्राचीन गणितज्ञांची काळाच्या पुढची दृष्टी आणि त्यांचे शोध पाहून चकित व्हायला होतं. सी. व्ही. रामन आणि चंद्रशेखर यांनी तर नोबेल पारितोषिकही भारतात खेचून आणलं. रामानुजनसारखा गणिती जगाला आजही विसरू म्हणता विसरता येत नाही. गणिती आकड्यांमधलं सौंदर्य शोधणारा त्याच्यासारखा जीनियस निराळाच! त्याच्या सापडलेल्या वह्यांमधल्या समीकरणांवर आज जगभरातले शेकडो विद्यार्थी पीएचडी करताहेत. वनस्पतींनाही भावना असतात असं सर जगदीशचंद्र बोससारखा कवीमनाचा शााज्ञच सिद्ध करू शकतो. बोस हे शााज्ञ तर होतेच पण विज्ञानकथा लिहिण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. खुद्द रवींद्रनाथ टागोर त्यांच्या लिखाणाचे चाहते होते. होमी भाभांनी अणुऊर्जेचा उपयोग किती गोष्टीत आपल्याला करता येईल हे भारताला दाखवून दिलं. देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अणुऊर्जेचं महत्त्व पटवत असतानाच भाभांमधला पर्यावरणप्रेमी सतत जागा असे. स्वातंत्र्यानंतर भारतात अन्नधान्याची जी टंचाई निर्माण झाली होती तिला हरितक्रांतीद्वारा स्वयंपूर्णतेेकडे जाणारा एम. एस. स्वामीनाथन यांनी एक मार्ग दाखवला. त्यांनी आपल्या संशोधनाबरोबरच रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे होणार्या धोक्यांचीही सूचना वेळोवेळी दिली. आपल्या गरजा मर्यादित ठेवणारा, सच्चा दिलाचा स्वामीनाथन हा जीनियस बघून नतमस्तक व्हायला होतं, तर मेघनाद साहासारखा खगोलशााज्ञ साहा समीकरणांमुळे जगप्रसिद्ध झाला. अतिशय गरिबीत दिवस काढलेल्या, अनवाणी पायानं शाळेत जाणार्या या मुलाला जातीभेदाचे चटकेही सोसावे लागले. मात्र कोणावरही त्याचा राग न काढता त्यानं आपलं संशोधन सुरू ठेवलं. दामोदर कोसंबीं किंवा डी. डी. कोसंबी या नावानं ओळखला जाणारा गणित आणि स्टॅटिस्टिक्स यामधला हा तज्ज्ञ, एक पुरोगामी विचारवंत आणि लेखक म्हणून म्हणून जगभर ओळखला गेला. कोसंबीचं प्रत्येक क्षेत्रातलं कार्य बघितलं तर अवाक् व्हायला होतं. तसंच जन्मानं ब्रिटिश असूनही ज्याच्या रक्तात भारतीयत्व वसलं होतं आणि ज्यानं भारतालाच आपली कर्मभूमी मानली असा लॉरी बेकर यानं आपल्याला वास्तूरचनेचे नवे धडे दिले. कमीत कमी पैशांत घरं कशी बांधली जाऊ शकतात - आणि तीही हवेशीर, सौंदर्यपूर्ण - याचा पुरावाच त्यांनी दिला. गांधींजीच्या विचारांचा प्रभाव असलेल्या लॉरी बेकर यांनी गांधीजींची तत्त्वं पाळत आपलं आय्ाुष्य साधेपणानं व्यतीत केलं. तसंच डॉ. जयंत नारळीकर या महाराष्ट्रीय खगोलशााज्ञानं तर विश्वविज्ञानामधलं ‘स्टेडी स्टेट’वरचं संशोधन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी लिहिलेलं साहित्य यानं आपली मान अभिमानानं उंचावली. पुण्यात ‘आय्ाुका’ सारख्या विज्ञानसंस्थेची उभारणी त्यांनी केली.
ही सगळी मंडळी ‘भारतीय जीनियस’ या मालिकेत तुमच्यासमोर येत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच आपण यांचंही स्वागत कराल ही खात्री आम्हाला आहेच.
पहिल्या टप्प्यातले ‘जीनियस’ आणि आता ‘भारतीय जीनियस’ अभ्यासताना आणि कागदावर उतरवताना आम्हाला अनेकांची मदत झाली. त्यात मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे, प्रा. सुकृता पेठे, डॉ. माधव राजवाडे, मुंबईच्या सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक संजीव बढे, डॉ. उमेश शिंदे, प्रा. नीलाबंरी जोशी यांनी प्रत्येक लेख वाचून त्यात महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यामुळे लिखाण निर्दोष होण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे त्रतुराज पत्की, डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ, डॉ. भास्कर जेधे, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर, किरण काळे, मय्ाूर जगताप, किरण केंद्रे, डॉ. संजीव कोल्हटकर, अजित आचार्य, विजय कसबे, आसावरी कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, परीक्षित सूर्यवंशी, रवी जाधव, अपूर्व देशमुख, सजल कुलकर्णी, अमृता प्रधान, सिद्धार्थ प्रभुणे, कल्याण टांकसाळे, विनय टांकसाळे, प्रज्ञा दासरवार, प्राजक्ता पाडगावकर, गणेश शंभू सरस्वती, डॉ. अमित नागरे, श्रुती जोशी, अमित राऊत, कल्याण तावरे, सुहास तेंडुलकर, नंदू माधव, प्रभाकर कोलते आणि ज्ञानेश्वर मुळे अशा अनेक मित्र-मैत्रिणींनी लेख वाचून त्यातलं विज्ञान सोपं आणि अचूक होण्याच्या दृष्टीनं काही मोलाच्या सूचना केल्या आणि लेखासाठी अतिरिक्त माहितीचे संदर्भही पुरवले.
तसंच साधना वझे, मधुवंती/सुहास भागवत, आसावरी/पुष्कर निफाडकर, रंजन भावसार, सुजाता गुप्ते, सुधीर महाबळ, सीमा/विकास धरेंगे, वैदेही/ज्ञानेश लिमये, पल्लवी अकोलकर, माधुरी काजवे, अमृता देशपांडे यांनी लिखाण वाचून प्रोत्साहन दिलं. या सगळ्यांमध्ये आमचा आयटी क्षेत्रातला मित्र दुष्यंत पाटील याची तर खूपच मोलाची मदत झाली. प्रत्येक जीनियसच्या बाबतीत त्यानं त्यांच्या संशोधनाच्या अचूकतेबाबत केलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. त्याच्या आयटीच्या व्यस्त दिनक्रमातूनही केवळ आपल्या विज्ञानावरच्या प्रेमामुळे त्यानं आम्हाला ही मदत केली त्याबद्दल आम्ही त्याचे अत्यंत त्रणी आहोत.
संदर्भासाठी आम्ही इंग्रजीतली अिाण मराठीतली अनेक पुस्तकं वापरली. शिवाय कित्येक व्हीडीओजही बघायला मिळाले. याशिवाय अरविंद गुप्ता यांच्या वेबसाईटवरची काही पुस्तकं, तसंच डॉ. जयंत नारळीकर, अतुल देऊळगावकर, चिंतामणराव देशमुख, धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेली पुस्तकं, अशा अनेकांच्या पुस्तकांची बहुमोल मदत झाली. यांची पुस्तकं मिळाली नसती तर कदाचित ‘भारतीय जीनियस’ हे परिपूर्ण होऊच शकलं नसतं.
ही सगळी मंडळी ‘भारतीय जीनियस’ या मालिकेत वाचकांसमोर येत आहेत. पहिल्या भागात आम्ही १२ वैज्ञानिकांवरच्या १२ पुस्तिका ३ भागांमध्ये केल्या होत्या. या वेळेस आम्ही ३ भागात १२ जीनियस मंडळींना विभागून तीन स्वतंत्र पुस्तकं करतो आहोत. आपण यांचंही स्वागत कराल ही खात्री आम्हाला आहेच. या सगळ्याच ‘जीनियस’ मंडळींचं आय्ाुष्य आणि त्यांचे शोध समजून घेतले तरी आपल्याही विचारांच्या कक्षा रुंदावतील आणि आपलंही आय्ाुष्य नक्कीच समृद्ध होईल अशी आशा वाटते. ‘जीनियस’ मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पुस्तकं विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, व्यावसायिक अशी कोणत्याही क्षेत्रातली मंडळी वाचू शकतात आणि प्रत्येक जीनियस त्यांना आपलाच मित्र, स्नेही, जिवलग वाटू शकतो हे निश्चित!
हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सौंदर्यवर्धनाचं काम मनोविकास प्रकाशनानं केलं आहे, त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार! अरविंद पाटकर, आशीश पाटकर, गणेश दीक्षित, भोर्हाडे यांचा या पुस्तकामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. शेवटी आमचे असंख्य वाचक - ज्यांचा स्नेह आम्हाला सदोदित लाभतो आहे, तो असाच वृद्धिंगत होवो या इच्छेसह, ‘भारतीय जीनियस’ आपल्यास सादर!
या मालिकेतला पुढला भाग हा तंत्रज्ञ मंडळींवरचा असून त्यात सॅम्य्ाुएल मॉर्स, अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल, गुलिएल्मो मार्कोनी, जॉन लॉगी बेअर्ड, एडिसन, निकोला टेस्ला, चार्ल्स बॅबेज, अॅलन ट्युरिंग, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, जेफ बेझॉस आणि मार्क झुकेरबर्ग, अशी संगणक आणि दूरसंचार या क्षेत्रांतली मंडळी आपल्या भेटीला लवकरच ‘जीनियस-३’ च्या रुपात येणार आहेत.
तसंच या प्रकल्पातला दुसरा प्रकल्प ‘बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड’ मधलं ‘बुक्स’ किंवा ‘किताबें’ हे पुस्तक आणि पाश्चिमात्य संगीतावरचं ‘सिंफनी’ ही दोन पुस्तकं लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. आपल्याला तीही नक्कीच आवडतील हा विश्वास वाटतो.
Add new comment