Grantha

जग बदलणारे ‘ग्रंथ’

जग बदलणारे ‘ग्रंथ’

आपण वाचतो. पुस्तकामागून पुस्तकं वाचतो. पण कितीही वाचलं तरी केवढं तरी वाचायचं राहूनच जातं. काही ग्रंथांची नावं माहित असतात. वाचलंच पाहिजे या यादीत ती ठळकपणे जागाही पटकावतात. पण काहीना काही कारणांनी ती वाचायची राहूनच जातात. यात ज्यांना सर्वार्थाने महाग्रंथ म्हणावे असे ग्रंथ देखील असतात. अशा 50 महाग्रंथांचा नेटका परिचय दीपा देशमुख यांनी ' जग बदलणारे ग्रंथ ' या ग्रंथात करून दिला आहे. आदीम काळापासून ते आजपर्यंत ते पुढचा काळ असा मानवी संस्कृतीचा मोठा पट या महाग्रंथांनी आपल्या कवेत घेतला आहे. त्यामुळे हे ग्रंथ वाचले की सबंध मानवी संस्कृती समजून घ्यायला मदत होऊ शकेल असा त्यांचा आवाका आहे. पुढे वाचा

 जग बदलणारे ‘ग्रंथ’...... ब्लर्ब

जग बदलणारे ‘ग्रंथ’...... ब्लर्ब

माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. पुढे वाचा

ग्रंथ

आली माझ्या घरी ही दिवाळी .... 

यंदाची दिवाळी सुखकर करण्यासाठी मनोविकास प्रकाशनाने अनेक अडथळे पार करून तसंच माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जग बदलणारे ‘ग्रंथ’ हे पुस्तक मला २८ तारखेला भेट दिलं, तसंच ते वाचकांसाठी देखील उपलब्ध करून दिलं आहे. मनोविकास आणि माझं नातं लेखक आणि प्रकाशक म्हणून तर आहेच, पण आम्ही एका विस्तारित कुटुंबाचा भाग देखील आहोत. त्यामुळे हातात ग्रंथाची प्रत घेऊन आज आपल्याशी संवाद साधताना विशेष आनंद होतो आहे. ‘ग्रंथ’चं अप्रतिम असं मुखपृष्ठ विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. हातात घेतल्याक्षणी ‘दुनिया मेरी मुठ्ठी मे’ चा फिल येतो! पुढे वाचा

जगावर प्रभाव टाकणारी पुस्तकं

जगावर प्रभाव टाकणारी पुस्तकं - शब्द दीप दिवाळी 2019

पुस्तकं जशी वैयक्तिक आयुष्य बदलून टाकतात, तशीच ती समाजालाही बदलून टाकण्याची ताकद बाळगतात. हिंदीतले विख्यात साहित्यिक निर्मल वर्मा म्हणतात की मी पुस्तक वाचण्याआधी जो होतो, तो पुस्तक वाचल्यानंतर तसा राहत नाही. माणसाला आरपार बदलून टाकण्याची किमया ही पुस्तकं जशी करतात तशीच ती संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकत असतात. पुस्तकांचं महत्व अधोरेखित करणार्‍या सफदर हाश्मी, गुलजार यांच्या कविता अतिशय सुरेश आहेत.  संपूर्ण जग बदलण्याची ताकद असलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांची ओळख करून घ्यायला हवी.
‘डॉयलॉग’ आणि गॅलिलिओ  पुढे वाचा