Genius

दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून आमच्या मनात घोळत होता! विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य, चित्र-शिल्पकला, संगीत आणि समाज/राज्यशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं असे ७२ युगप्रवर्तक ‘जीनियस’ या मालिकेतून टप्प्याटप्प्यानं वाचकांसमोर आणायचं आम्ही ठरवलं. जग बदलण्याचा ध्यास घेतलेल्या या शोधकांनी आपल्या जगण्याची दिशाच बदलवली. त्यांनी आडवळणाची काटेरी वाट निवडली आणि झपाटल्यासारखे ते आपल्या ध्येयासक्तीच्या दिशेनं प्रवास करत राहिले. पुढे वाचा

विनम्र अभिवादन - भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

विनम्र अभिवादन - भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  एके दिवशी आपल्या सहकार्‍याबरोबर बोलत होते. मधूनच ते समोर उभ्या असलेल्या आपल्या माळ्याला आपल्या संभाषणात खेचत विचारायचे, ‘‘काय रे, मी म्हणतोय ते पटतंय ना? तुझं काय मत आहे?’’ शास्त्रीजींच्या सहकार्‍याला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. ते संभाषण चालू असेपर्यंत किमान दोन-तीन वेळा तरी शास्त्रीजींनी त्या माळ्याला चालू असलेल्या चर्चेत त्याचं मत आणि सल्ला विचारला होता. अखेर न राहवून त्यांच्या सहकार्‍यानं शास्त्रीजींना ते असं का करताहेत याचं कारण विचारलं, तेव्हा शास्त्रीजींनी आपल्या सहकार्‍याला जी गोष्ट सांगितली ती अशी होती:  पुढे वाचा

गॅलिलिओ गॅलिली

गॅलिलिओ गॅलिली

जंगलात राहणार्‍या एका माणसाच्या कानावर रात्रीच्या वेळी एक वेगळाच मधुर आवाज पडला. तो माणूस आवाजाच्या दिशेनं शोध घेत निघाला तेव्हा त्याला वाटेत अनेक प्रकारचं संगीत ऐकू आलं. रातकिड्यांची किणकिण, मंदिराच्या दाराच्या बिजागरींच्या आवाजातलं नादावणारं संगीत, गांधीलमाशीच्या पंखांच्या फडफडण्यातलं अवीट संगीत, नाकतोड्याच्या पायातून निर्माण होणारं लयबद्ध संगीत त्याला या वाटेत ऐकायला मिळालं. इतकंच काय पण पुढे दोन मद्य पिणार्‍या मद्यपींच्या नखाच्या टिचकीनं प्याल्यांवर निर्माण होणारं संगीतही त्या माणसाला खूपच जादुई वाटलं. तेवढ्यात त्या माणसाच्या हातावर चिकाला नावाचा एक कीटक येऊन आदळला. पुढे वाचा

मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस” 

मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस” 

खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून मनात घोळत होता. या संदर्भातले तीन प्रकल्प आमच्या मनात होते आणि आहेत. लवकरच बाकी दोनही प्रकल्प वाचकांसमोर येतील. यातला पहिला प्रकल्प म्हणजे असे जीनियस की ज्यांनी जग बदलवलं. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, समाज/राज्यशास्त्र, व्यवस्थापन, संगीत, साहित्य, चित्र/शिल्पकला अशा अनेक क्षेत्रातले ७२ जगातले युगप्रवर्तक जीनियस आम्ही निवडले. त्यापैकी १२ जीनियस वैज्ञानिकांचा संच यंदाच्या दिवाळीत प्रत्येकी ६०-७० पानी १२ पुस्तकांच्या संचात आपल्यासमोर येतोय. पुढे वाचा

दिवाळीत दाखल होणार्‍या १२ जीनियसचे लेखक काय म्हणताहेत?