Canvas

नव्या रुपातलं ‘कॅनव्हास’, मनोविकास आणि मी!

नव्या रुपातलं ‘कॅनव्हास’, मनोविकास आणि मी!

गेले काही दिवस खूपच धावपळीचे गेले. कबूल केल्याप्रमाणे लेख, नव्या पुस्तकांवरचं काम आणि व्याख्यानांचे कार्यक्रम यात रोजचा दिवस कुठे जातो कळतच नाही. यात एक महत्त्वाची गोष्ट राहूनच जातेय हे लक्षात आलं. ती म्हणजे नव्या आकर्षक देखण्या रुपातलं आमचं ‘कॅनव्हास!’ २५ एप्रिल २०१५ साली मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे आमचं ६०८ पानी चित्र-शिल्प कलेचा इतिहास आणि चित्र-शिल्पकार यांचं आयुष्य यावरचं पुस्तक! या पुस्तकाला देखणं करण्यासाठी गिरीश सहस्त्रबुद्धे या चित्रकार मित्रानं आणि मनोविकासचे आशिश पाटकर, अरविंद पाटकर आणि गणेश दिक्षितसह संपूर्ण टीम यांनी खूपच परिश्रम घेतले. पुढे वाचा