कल्याणचा वाढदिवस आणि मकरसंक्रांत!
आज कल्याणचा वाढदिवस आणि मकरसंक्रात! कल्याणकडे पोहोचताच, संकेतने माझ्याकडे गंभीर चेहर्यानं बघितलं आणि म्हणाला, 'ताई....' मी घाबरलेच, हा काय गंभीर बातमी सांगतोय. त्याच गंभीर आवाजात तो म्हणाला, 'ताई, आज तू छान दिसतेस!' मी समाधानाचा सुस्कार सोडला आणि त्याला म्हटलं, 'छान फोटो काढतोस?' त्यानं आनंदानं होकार दिला. त्याला फोटोग्राफीची प्रचंड आवड असून त्याला त्यातच करिअर करायचं आहे. त्यातच माझ्यासारखा नमुना भेटल्यावर काय होणार?
त्याच्या उत्साहाला मीच उधाण आणलं. तो त्याची सामग्री घेऊन फोटो काढायला सज्ज झाला. मग चार वर्षांपूर्वीच्या याच दिवसाच्या आठवणी काढत कल्याण, प्रज्ञा आणि मी - आमचे फोटो संकेतनं इमानइतबारे काढले. त्यानंतर अर्थातच पुरणपोळीसह जेवण झालं आणि मी सगळ्यांचा निरोप घेतला. निघताना संकेतकडे बघितलं, माझ्यातला मोगॅम्बो पुन्हा एकदा खुश झाला.
त्याला Thank You म्हणत डुलत डुलत घराकडे निघाला!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment