वाढदिवस - यतीन राजसी शास्त्री अपूर्व
आज माझा वाढदिवस...सकाळपासून जवळच्या मित्रमैत्रिणींचे शुभेच्छांचे फोनकॉल्स...खरोखरंच शेकडो....फेसबुक, व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वेगळेच....अर्थात सगळं छानच वाटत होतं....आज प्रत्यक्ष जे इथे आले नव्हते ते सगळेच माझ्याजवळ आहेत असच वाटत होतं.
मग सकाळपासून कामांना सुरुवात केली...दुपारी एका गंभीर मिेत्राबरोबरची मिटिंग होती...आणि एका गंभीर विषयावर बोलत असताना समोर मला ती दिसली....माझं बोलण्यातलं लक्षच उडालं आणि मी समोरच्या टेबलकडे धावले...माझ्या मित्राला काही कळेना...तोही माझ्या मागोमाग आला...त्या टेबलवर माझी आवडती मनीमाऊ बसली होती...किती गोड, किती क्यूट...माझ्या गंभीर मित्राला मी विनंती करताच त्यानं माझा बालीश हट्ट पुरवत त्या मनीसोबत माझे दोन फोटो काढून दिले. केवढे उपकार झाले माझ्यावर....मला तर वाढदिवसाची ही भेट एकदम हटके वाटत होती...
सायंकाळी घरी परतल्यावर अचानक पुन्हा एकदा दारावरची बेल नॉनस्टॉप वाजत राहिली...कोण आगंतुक म्हणत दार उघडलं तर समोर शास्त्री, कीर्तीसुधा, यतीन, राजसी, अपूर्व, अजिंक्य, अतुल.....कीर्तीच्या हातातले लाल, पिवळे गुलाब सागरची आठवण देऊन गेले.
शेजारच्याच हॉटेलमध्ये आमची वरात वाजतगाजत गेली. तिथं शास्त्रीने त्याच्या मोठ्या आवाजात बार बार दिन ये आये असं म्हणत चक्क गायला सुरुवात केली...आता मला सार्वजनिक ठिकाणी तो संकोच वाटत नाही...कारण शास्त्रीबरोबर राहिलं की तो संकोच गळून पाडावाच लागतो हे आता अनुभवानं शिकलेय...
हॉटेलमध्ये आलेले सगळे बघायला लागलेच...हसत खेळत केक, जेवण...असं सगळं पार पडत असतानाच हॉटेलमालकानं शास्त्रीचा दमदार ‘बार बार दिन ये आये’ हा आवाज ऐकला होताच...त्यानं एक मोठ्ठा बाऊल भरून गरम गरम स्वादिष्ट गुलाबजाम समोर आणून ठेवले आणि म्हणाला, आपका बर्थ डे है तो हमारी तरफ से! मी चकित!
खरं सांगू हे सगळं का सांगतेय...........आज खर्या अर्थानं एकदम दिवाळी सुरू झाल्याची जाणीव झाली!
Love You all!!!!
Thanks to all!!!!!!!
Add new comment