कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन ....
मार्केटयार्ड रस्त्यावर उत्सव हॉटेलच्या समोरच्या गल्लीत मिरची नावाचं साधं हॉटेल आहे. इथला शेवगा फ्राय खूप प्रसिद्ध आहे. इथे महाराष्ट्रीयन जेवण खूप चविष्ट मिळतं. लसुनी मेथी, फोडणीचं वरण, तांबडं पिठलं, गरमागरम भाकरी आणि ताक असं काल रात्री मस्त जेवण झालं. जेवताना चांगली सोबत नेहमीच असावी, म्हणजे जेवणाची रंगत वाढते. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर काल आमच्यासोबत होते. पुढल्या लेखन प्रकल्पाविषयी गप्पा आणि उत्कृष्ट जेवण, मजा आ गया!
अर्थात, मिरची हे ठिकाण काही वर्षांपूर्वी अच्युत गोडबोले यांनी मला दाखवलं म्हणजे नेलं. तोच वसा मीही पुढे चालवत राहिले. माझ्या अनेक मित्र-मैत्रिणीना मी मिरचीचा शेवगा फ्राय खाऊ घातलाय. तुम्हीही जरूर आस्वाद घ्या👍
25/06/2017
        
Add new comment