वाहरू सोनावणे
तारीख
वाहरू सोनावणे या आदिवासी कार्यकर्त्याबरोबर ब्रेकफास्ट आणि त्यांच्या कविता यांचा आस्वाद घेताना !!!!!!
स्टेज
आम्ही स्टेजवर गेलोच नाही
आणि आम्हाला बोलावलंही नाही
बोटांच्या ईशार्यानी
आमची पायरी आम्हाला दाखवून दिली
आम्ही तिथेच बसलो
आम्हाला शाबासकी मिळाली
आणि ते स्टेजवर उभे राहून
आमचे दुख आम्हालाच सांगत राहिले
आमचे दुख्ख आमचेच राहिले
कधीच त्यांचे झाले नाही
आमची शंका आम्ही कुजबुजलो
ते कान टवकारून ऐकत राहिले
नि सुस्कारा सोडला
आणि आमचेच कान धरून
आम्हालाच दम भरला
माफी मागा, नाहीतर ...!
Add new comment