Tantradnya Genius

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि क्षणार्धात ती समोर येऊन हजर व्हावी....तसंच! आजच्या युगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. पुढे वाचा

तंत्रज्ञ जीनियस

तंत्रज्ञ जीनियस

सुरुवातीला मनोविकास प्रकाशनानं माझी ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ या मालिकेत अरविंद गुप्ता, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. रवी बापट अशी सात पुस्तकं स्वतंत्रपणे प्रकाशित केली आणि या पुस्तकांना वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘कॅनव्हास’ या चित्र-शिल्प कलेवरच्या ६०८ पानी पुस्तकानंतर आम्ही - मी आणि अच्युत गोडबोले यांनी - ‘जीनियस’ ही मालिका वैज्ञानिक, गणितज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञ, समाजसुधारक अशा  ७२ जगप्रसिद्ध दिग्गज व्यक्तींना घेऊन एका वेळेस १२ व्यक्तींना घेऊन करायचं ठरवलं. पुढे वाचा

एक झपाटलेला तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्ज

एक झपाटलेला तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्ज

'अॅपल’ कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यानं प्रचंड लोकप्रिय उत्पादनं तयार करून उद्योगविश्‍वात शून्यातून आपलं साम्राज्य निर्माण केलं. आयफोन, आयपॅड आणि टॅब्लेट कॅम्प्युटर लोकांसमोर आणून त्यानं जगभर खळबळ माजवली. मायाोसॉफ्टच्या झंझावातातही अॅपल कंपनी मजबूतपणे टिकाव धरून उभी होती. आयमॅक, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड ही उपकरणं तयार करुन त्यानं तंत्रज्ञानाचं जग कित्येक दशकांनी पुढे नेऊन ठेवलं. स्टीव्ह जॉब्ज हा सर्वसामान्य लोकांसाठी सुपरहीरो तर होताच पण जगभरातल्या कोट्यवधी लोकांना त्यानं आपल्या अचाट तंत्रज्ञानानं भुरळ पाडली होती. पुढे वाचा

एडिसन

एडिसन - तंत्रज्ञ जिनियस

थॉमस अल्वा एडिसनचं नाव विजेच्या दिव्याच्या शोधामुळे अजरामर झालं. एडिसनचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ या दिवशी अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या मिलान या गावी झाला. त्याच्या आईचं नाव नॅन्सी एलियट तर वडिलांचं नाव सॅम्युएल होतं. वडील हॉटेलचा व्यवसाय करत, तर आई शिक्षिका होती. एडिसन केवळ ३ महिनेच शाळेत गेला. याचं कारण म्हणजे त्याच्या वर्गातल्या शिक्षकांनी 'एडिसन अतिशय बुद्दू असून तो शिकूच शकणार नाही' असं सांगितलं. खरं कारण असं होतं की एडिसन त्याला वाटणार्‍या कुतुहलापोटी अनेक प्रश्‍न विचारत असे. त्याचं टोपणनाव ‘व्हाय’ असंच पडलं होतं. ए फॉर ऍपल हे तर ठीक आहे, पण काही सफरचंद लाल आणि काही हिरवी का असतात? पुढे वाचा

१२ तंत्रज्ञ जीनियस - मनोगत

१२ तंत्रज्ञ जीनियस - मनोगत

सुरुवातीला मनोविकास प्रकाशनानं माझी ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ या मालिकेत अरविंद गुप्ता, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. रवी बापट अशी सात पुस्तकं स्वतंत्रपणे प्रकाशित केली आणि या पुस्तकांना वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘कॅनव्हास’ या चित्र-शिल्प कलेवरच्या ६०८ पानी पुस्तकानंतर आम्ही - मी आणि अच्युत गोडबोले यांनी - ‘जीनियस’ ही मालिका वैज्ञानिक, गणितज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञ, समाजसुधारक अशा  ७२ जगप्रसिद्ध दिग्गज व्यक्तींना घेऊन एका वेळेस १२ व्यक्तींना घेऊन करायचं ठरवलं. पुढे वाचा

तंत्रज्ञ जीनियस

तंत्रज्ञ जीनियस

'जीनियस' या प्रकल्पात ७२ जग बदलवणाऱ्या जगप्रसिद्ध लोकांचं कार्य आणि त्यांचं आयुष्य याविषयी लिहायचं (पीपल हू चेंज द वर्ल्ड) असं आम्ही तीन वर्षांपूर्वी ठरवलं आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी १२ व्यक्ती 'जीनियस'च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतील असं आम्ही नियोजन केलं. त्यानुसार सुरुवातीला गॅलिलिओ पासून रिचर्ड फाईनमनपर्यंत १२ वैज्ञानिक आपल्या भेटीला आले. कोणाला स्टीफन हॉकिंगनं प्रभावित केलं, तर कोणाला गॅलिलिओची झालेली परवड बेचैन करून गेली. काही विद्यार्थ्यांनी रिचर्ड फाईनमनसारखं आम्हाला व्हायचंय असं कळवलं, तर काहींना मेरी क्युरीनं 'निराश होऊ नका काम करत राहा'चा संदेश दिला. पुढे वाचा