मंत्र - प्रीमियर शो - city pride, kothrud
मंत्र हा चित्रपट रविवारी बघितला. सौरभ गोगटे हा आयटी मधला तरुण एके दिवशी सगळं सोडून चक्क मुंबईत अभिनय करण्यासाठी पोचला. त्याची दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका गाजली. मी अनेकदा crime पेट्रोल बघते आणि त्यातल्या अनेक भागात सौरभ गोगटेला बघते. हा मुलगा खूप चांगला अभिनय करतो!!!
सौरभ च्या आग्रहामुळे आम्ही मंत्र बघायला गेलो. या चित्रपटातल्या सगळ्यांचाच अभिनय अप्रतिम !!! संगीत श्रवणीय आणि आजच्या तरुणाइला आकर्षित करणारं, अजय - अतुल च्या आवाजातलं खास गाणं यात आहे. कथानक कुठेही रेंगाळत नाही. यातले देव, धर्म, कर्मकांड, राजकारणात धर्माचा केलेला वापर, कालबाह्य गोष्टी, असे अनेक वाद विचार करायला प्रवृत्त करतात ......मात्र माझी स्वतःची विचारधारा वेगळी असल्याने शेवटाकडे जाताना solution न देता प्रेक्षकांवर शेवट सोडायला हवा होता असं वाटलं.
हा चित्रपट सौरभ म्हणजेच यातला निरंजन - त्याच्यासाठी - डेविड साठी - सनी साठी . दीप्ती साठी - मनोज जोशी साठी - अनुराधा मराठे साठी आणि पुष्कराज याच्यासाठी जरूर बघा !!!! सनी बघताना डॉ अमित नागरे ची आठवण आली !!!
Add new comment