काजव्यांचा गाव
धनंजयच्या आग्रहानुसार नुकतंच प्रदीप वैद्य लिखित, दिग्दर्शित ‘काजव्यांचा गाव’ हे नाटक सुदर्शनला बघितलं. ‘काजव्यांचा गाव’ हे इर्मसिव्ह थिएटर प्रकारातलं नाटक. अशा नाटकांमध्ये स्टेज वेगळं आणि प्रेक्षक वेगळे असे भाग नसतात. सगळं काही एकमेकांत मिसळून गेलेलं असतं. प्रेक्षकांमध्येच नाटक घडतं म्हणा, किंवा प्रेक्षकच नाटकाचा एक भाग बनतात असं म्हणा.
नाटक बघताना महेश एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी'ची आठवण येत होती. नाटक संपल्यावर प्रदीप वैद्य आणि इतर सर्व कलाकारांना भेटलो आणि मनात लुकलुकणार्या असंख्य काजव्यांना बरोबर घेऊन अपूर्व आणि मी घरी परतलो.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment