Symphony

 सिंफनी

सिंफनी

कॅनव्हासनंतरचं मी आणि अच्युत गोडबोले आम्ही मिळून लिहिलेलं ५५० पानी मोठं पुस्तक म्हणजे सिंफनी! हे पुस्तक पाश्चिमात्य संगीतकार आणि संगीत यावर भाष्य करणारं आहे. कॅनव्हासप्रमाणेच या पुस्तकात पाश्चिमात्य संगीताचा अभिजात काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा इतिहास उलगडला आहे. अनेक सांगितिक संज्ञांचे अर्थ दिले आहेत. सुरुवातीला चर्चसाठी लिहिलेलं संगीत कसं बदलत गेलं. त्यानंतर ते राजेरजवड्यांपर्यंत जाऊन पोहोचलं. त्यानंतर सर्वसामान्यमाणसं या संगीताचा भाग बनली. त्यानंतर उपेक्षितांचं जगणं, त्यांचा प्रवास उलगणारं बंडखोर संगीत तयार झालं. या संगीताचा प्रवास खूपच अनोखा आहे. पुढे वाचा

लुडविग व्हॅन बीथोवन 

लुडविग व्हॅन बीथोवन 

एक संगीतकार आपल्या नवव्या सिंफनीचं संचलन करत होता. ही सिंफनी पूर्ण होताच आख्ख्या सभागृहातले मंत्रमुग्ध झालेले श्रोते टाळ्यांचा कडकडाट करत भारावलेल्या अवस्थेत उभे होते.  पण दैवदुर्विलास बघा! त्या संगीतकाराच्या कानावर त्याचं हे कौतुक पडतच नव्हतं. कारण हा संगीतकार त्या वेळी ठार बहिरा झालेला होता. आपल्या लाडक्या संगीतकारापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी श्रोत्यांनी केवळ टाळ्याच नाही तर कुणी रुमाल हवेत उडवून, कुणी आपल्या टोप्या काढून वर हवेत फेकत, कुणी हात वर करत आपला आनंद व्यक्त केला आणि त्यांनी त्याला उभ्यानं ५ वेळा मानवंदना दिली. पुढे वाचा

सिंफनी - पाश्चात्त्य संगीताची सुरीली सफर!

सिंफनी - पाश्चात्त्य संगीताची सुरीली सफर!

नुकतंच अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखकद्वयींनी लिहिलेलं ‘सिंफनी’ हे पाश्चात्त्य संगीत आणि संगीतकार यांच्यावर आधारलेलं पुस्तक वाचलं. जगावर ज्यांच्या कार्यांनी परिणाम केला असे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, गणितज्ञ यांच्यावर आधारित याच लेखकद्वयींचा याआधीचा 'जीनियस' प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात चांगलाच रुजलेला आहे. तसंच पाश्चात्त्य चित्र-शिल्प कलेवर आधारित त्यांचा ‘कॅनव्हास’ हा ही ग्रंथ तितकाच वाचनीय आणि वाचकाची ज्ञानलालसा पूर्ण करणारा! या पुस्तकांमुळे अर्थातच 'सिंफनी'विषयीची उत्सुकता आणि अपेक्षा वाढलेल्या होत्या.  पुढे वाचा

SYMPHONY - माझं 'मनोगत'- 27 मे 2018

SYMPHONY - माझं 'मनोगत'

सिंफनी - प्रतीक्षा फक्त 15 दिवसांची.... सिंफनी लिहीत असताना काय काय घडलं? संगीत केवळ आयुष्यात साथसोबतच करत नाही तर आपलं आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करतं हे समजलं. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेतं. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणतं. आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त व्हायला मदत करतं ते संगीतच! संगीतातून वेगवेगळ्या भावनांचा अविष्कार होतो. राग आला तर संगीत ऐकावं, आनंद झाला तर संगीत ऐकावं आणि दुःख झालं तरी संगीताचे स्वर त्या दुःखातून बाहेर काढायला साहाय्यभूत होतात. नैराश्यातून बाहेर काढायलाही संगीतच आपला हात पुढे करतं. पुढे वाचा