स्टोरी टेलच्या कट्टयावर आज धमाल!
संतोष देशपांडे या हरहुन्नरी मित्राचा फोन आला आणि ठरलेल्या पत्त्यावर भेटायचं ठरलं. त्याआधी प्रसाद मिरासदार या मित्राबरोबर सकाळी एक मिटिंग पार पडली. औपचारिक मिटिंग अधिक मित्र म्हणून त्याला जोडून अवांतर गप्पा अशी आमची भेट रंगली. त्यात आपण आता अस्सल पुणेकर कसे झालो आहोत याचे काही भन्नाट अनुभव प्रसादनं शेअर केले. बोलता बोलता आम्ही स्टोरी टेल पॉडकास्ट स्टुडिओत जाऊन पोहोचलो.
संतोष, यमाजी, प्रभाकर भोसले, गांगल असे आम्ही पाच-सहा जणांनी काही वर्षांपूर्वी परूळेकर ट्रस्ट सकाळच्या वतीनं महाराष्ट्रभरात पत्रकारांसाठी कार्यशाळा घेतल्या होत्या. तेव्हा प्रवासात आम्ही धमाल करत असू. याच आठवणींनी आमची मैत्री फार न भेटताही अधिकच घट्ट होत गेली. आज त्या आठवणींचं हासू चेहर्यावर पसरलेलं होतंच. त्यात माझ्याशी गप्पा मारायला उर्मिला निंबाळकर नावाची एक देखणी, नाजूक तरूणी काहीच वेळात लगबगीनं ऑफीसमध्ये पोहोचली. या पोरीला ओळखीबिळखीची गरजच लागू नये असं व्यक्तिमत्व! १० हजार वर्षांपासून आम्ही एकमेकींना ओळखतो अशा रीतीनं आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्या भेटीचे काही फोटोज!
या धमाल गप्पा काय होत्या हे उद्या मी सांगणारच आहे, कशामुळे गप्पा मारल्या तेही सांगणार आहे आणि हो त्या पॉडकास्टची लिंकही देणार आहे.
https://audioboom.com/posts/7524508
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment