यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या अपंग हक्क विकास मंचाची घौडदौड
एखादी संस्था, एखादं सामाजिक कार्य उभं राहतं ते काही व्यक्तींच्या सक्रिय सहभागामुळे! हळूहळू त्या त्या संस्थेचं कार्य विस्तारत जातं, त्यात अनेक उपक्रम, अनेक कार्यकर्ते सामील होत जातात आणि हा सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्यांचा कारवाँ पुढे पुढे चालत राहतो. मुंबईची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेचं नावं महाराष्ट्राला परिचित आहेच. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे कृषी, सहकार, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक, पर्यावरण, युवा वर्गासोबत, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम चालू आहे. पुढे वाचा