तुम भी चलो, हम भी चले, चलती रहे जिन्दगी....
तुम भी चलो, हम भी चले, चलती रहे जिन्दगी...........निरोपाची वेळ जवळ आली होती. तो बोलत होता,‘दीपा, जे कोणाशीही बोलता येत नाही, ते तुझ्याजवळ बोलतो मी. तुझ्याशी बोलताना मला खूप आश्वस्त वाटतं. तू खूप जवळची वाटतेस मला.’ त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. अशा वेळी कसं समजवावं मला कळत नाही. मी त्याचा हात माझ्या हातात घट्ट पकडून ठेवला. आम्हाला दोघांनाही आठवत होता तो मराठवाडी भुरका, पेरूची भाजी, पिठलं, मेथीची परतलेली भाजी, ज्वारीची भाकरी, मसाला खिचडी .....अमितची गाणी - माझी गाणी....त्या न संपणार्या गप्पा....त्या आठवणींनी आमच्या चेहर्यावर हसू पसरलं. हे क्षण आपण पुन्हा आणू शकतोच की. जग जवळ आणू, असं म्हणत मग हसत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. समीर आणि अमितची गाडी मुंबई एअरपोर्टच्या दिशेनं धावत सुटली आणि माझं मन गात राहिलं,
तुम भी चलो, हम भी चले, चलती रहे जिन्दगी.....
(मैत्रिणीनं विचारलं, किती दिवसांची मैत्री आहे तुमची? मी म्हणाले, दहा हजार वर्षांची!)
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment