शाही खजाना
कालपरवा पुस्तकांचा खजिना मिळाला, तर आज शाही खजाना हाथ लग गया...सकाळी फोन आला, दीपाताई घरी आहेस का, मी दिवाळीसाठी सांगलीला जाणार आहे, तर जाण्याआधी तुला भेटून जावं म्हणते. मी तिला आनंदानं ये म्हटलं.
ती आणि तिचे पतीदेव दुपारी माझ्याकडे आले. संध्याची आणि माझी ओळख कल्याण या मित्रामुळे झाली. संध्या मला भेटली, तेव्हा मुली मोठ्या होण्याच्या वयात, नवरा त्याच्या कामात व्यस्त आणि संध्यानं कामं आटोपल्यावरचा वेळ कसा घालवायचा म्हणून केलेलं टेरेस गार्डन...त्यातच तिचा चॉईस चांगला असल्यानं तिने घरातल्या घरात साड्या विक्रीचाही व्यवसाय सुरू केला. पण तरीही तिची पोकळी तिला अस्वस्थ करत होती. अशा वेळी तिनं सांगलीचे मसाले प्रसिद्घ असल्यामुळे आणि संध्याही सांगलीची असल्यामुळे तिनं संध्याज किचन या नावानं वेगवेगळे मसाले तयार करायला सुरुवात केली. तिचे कष्ट आणि तिची जिद्द बघून तिच्या नवर्यानंही मनावर घेतलं आणि तिचे कष्ट कमी व्हावेत म्हणून अनेक प्रकारच्या तिच्या कामासाठी साहाय्यभूत ठरणार्या मशिन्स घेऊन दिल्या. आता संध्या एकदम बिझीबी झाली असून काम करण्याचा आनंद, समाधान आणि तृप्ती मला तिच्या चेहर्यावर दिसली. दोघांनाही खुश बघून लई भारी वाटलं.
अरे हो, सांगायचं राहिलंच, संध्याने दिवाळी भेट तर आणलीच होती, पण त्याचबरोबर हा मसाल्यांचा शाही खजाना मला अत्यंत प्रेमानं दिला. खूप दिवसांनी, नव्हे महिन्यांनी नव्हे कोरानापूर्व काळात कधीतरी आम्ही भेटलो होतो, ती भेट आठवून गप्पा मारल्या आणि दोघांनीही पुन्हा भेटू म्हणत निरोप घेतला. पण जाताना ही मैत्रीण मला शाही खजाना देऊन मालामाल करून गेली. थँक्यू संध्या आणि थँक्यू शरद.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment