बस इतनासा ख्वाब है...
सकाळी सात वाजता तय्यार होऊन
अपूर्व आणि मी लोणावळा दिशेनं कूच केलं.
अपूर्व म्हणाला, एवढी का तय्यार झालीस?
मी हसले आणि मनातल्या गोविंदानं म्हटलं, मेरी मर्जी!
हवेत सकाळचा गारवा होता, दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडी आणि मधूनच
पिवळ्या धम्मक फुलांचे ताटवे बहरलेले दिसत होते..
रस्त्यात मिसळपाव, वडापाव आणि पोहे असा भरपेट नाश्ता केला
लोणावळ्यात हवी ती क्रॉकरी विकत घेतली,
प्रवासात गाण्यांनी बहार आणली,
सवाँर लू, ये मोह मोह के धागे, रसभरी,
इत्तीसी हसी, इत्तीसी खुशी, नैनांदा का कसूर बेकसूर
मीही मग जोरजोरात साथ द्यायला सुरुवात केली.
मनसोक्त खरेदी आणि भटकंती करून
तृप्त मनानं घर गाठताना पुन्हा गुणगुणले,
बस इतनासा ख्वाब है...
दीपा देशमुख, पुणे
Add new comment