मनिके मगे हिथे
२८ वर्षांची योहानी नावाची एक तरुणी, एक गाणं काय गाते आणि अल्पावधीत अख्ख्या जगाला वेड लावते. श्रीलंकेची नागरिक असलेल्या योहानीने सिंहली या भाषेत हे गाणं गायलं आणि ते वाऱ्यापेक्षाही जास्त वेगानं जगभरचे लोक गाऊ लागले, बंगाली, मल्याळम, तेलुगू, हिंदी इतकंच काय पण कोकणी, मराठी भाषेतही भाषांतर करत आपली तरुणाई हे गाणं गाऊ लागली. पुण्याचा ट्रफिक पोलिस असलेल्या आतिश खराडे यानं गायलेलं मराठी व्हर्जन देखील खूप लोकप्रिय झालं आहे. १० कोटीपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं ऐकलं असून खुद्द अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, प्रियंका चोप्रा यांनी हे गाणं शेअर करत आपली पसंती दर्शवली आहे. यूट्यूबवर या सगळ्या भाषांतराचे व्हिडिओज उपलब्ध असून बघण्यात एक वेगळीच मौज आहे. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये एकीकडे योहानी गाणं गातेय, तर अध्या भागात अमिताभ बच्चनचा कालिया आणि कुठल्यातरी चित्रपटातला डान्स सुरू आहे, तो योहानीच्या गाण्यावर चपखल बसतो आहे. जरूर बघा.
खेड्यातली एक सुंदर तरुणी - तिच्या प्रेमात पडलेला तरूण तिला उद्देशून हे गाणं गातोय. नुकतीच एनडीटीव्हीवर योहानीची मुलाखत झाली. या मुलाखतीत तिने अतिशय नम्रपणे भारतीयांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. हे गाणं इतकं हिट होईल याची आपल्यालाही कल्पना नव्हती असं तिनं सांगितलं. मल्याळम भाषेतलं गाणं योहानीनं स्वत: गायलं आहे. अनेक तरूणांनी तिचं हे गाणं अतिशय सुरेखरीत्या गायलं असून गाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं गाणं ऐकण्याइतकंच सुखकर आहे. योहानी एक श्रीलंकन गायिका तर आहेच, पण ती गाणी लिहिते, गाण्यांना संगीत देते. ती एक यूटयूबर असून टीकटॉक स्टार देखील आहे. योहानीला ए.आर. रहेमान हा संगीतकार आवडतो. योहानी इतकी गोड आहे की हे गाणं गाताना तिला ऐकणं आणि तिला बघणं हाही एक नितांत सुदंर अनुभव आहे. जरूर ऐका.
मनिके मगे हिथे
मुदुवे नूरां हंगुम यावी ऐवीलेवी
एरिये नुम्बे नागे
मागे नेन्नेहा में हयावी सिहीवेवी
मा द लांग म देवठी नां
उरु पेमेक पेठलना
उअनारी मनहारी
सुकुमालि नुम्बथमा
मा द लांग म देवठी नां
उरु पेमेक पेठलना
उअनारी मनहारी
सुकुमालि नुम्बथमा
मनिके मगे हिथे
मनिके मागे हिथे
मुदुवे नूरां हंगुम यावी ऐवीलेवी
एरिये नुम्बे नागे
मागे नेन्नेहा में हयावी सिहीवेवी
MANIKE MAGE HITHE | YOHANI | MARATHI VERSION | AATISH KHARADE - YouTube
Add new comment