प्रकाशन व्यवसाय आशिश पाटकर - प्रथम
प्रकाशन व्यवसाय - आशिश पाटकर हा पदवीधर तरूण असून तो मनोविकास प्रकाशन या नामांकित प्रकाशनसंस्थेचं काम बघतो.
आशिशचे वडील अरविंद पाटकर हे कार्यकर्ते असून त्यांनी मनोविकास प्रकाशन ही संस्था ३० वर्षांपूर्वी सुरू केली. त्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू आशिशला घरातूनच मिळाले. आशिशची बोलताना एका प्रकाशन व्यवसायासाठी काय काय आवश्यक गोष्टी असतात त्याविषयी त्याने माहिती तर दिलीच पण अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो हे सांगितलं.
प्रकाशन व्यवसाय करणे म्हणजे अनेकविध विषयांवरच्या पुस्तकांची निर्मिती करणे आणि त्या पुस्तकाची विक्री घडवून आणणे होय.
प्रकाशन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार्याष आवश्यक गोष्टी ः
• प्रकाशन व्यवसायात येऊ इच्छिणार्यारचं चौफेर वाचन हवं. चिकाटी हवी आणि संयम हवा.
• पुस्तक ज्या विषयावर तयार करायचं आहे त्याची उपय्ाुक्तता समजण्याची पात्रता हवी.
• विषयाची निवड करताना विषयाची आवश्यकता, विचार करण्याची दृष्टी हवी.
• योग्य लेखकांचा शोध
• संपर्कासाठी एक विशिष्ठ ठिकाण हवं.
प्रत्यक्ष कामासाठी लागणार्याठ आवश्यक तांत्रिक गोष्टी ः
• संपादकीय टीम आणि संपादकीय संस्कार
• मजकूर डीटीपी करणं, प्रुफं तपासणं
• लेआऊट, डीझाइनिंग
• चित्रकाराची निवड करणं, मुखपृष्ठनिर्मिती
• मार्केटिंग, वितरण व्यवस्था
(या व्यवसायात जवळपास ९० टक्वे कामं आऊटसोर्सिंग करूनच केली जातात. यातला महत्वाचा भाग म्हणजे वितरण. पुस्तक पोचवणार्यां एजन्सीजचा शोध घेणे आणि त्यांच्यामार्फत वितरण केलं जातं.)
फायदे ः
• संस्कारक्षम लोकांचा सहवास मिळतो त्यामुळे तुम्हीही समृद्ध बनता.
• आर्थिक नफा चांगल्या प्रमाणात आहे.
• समाजात चांगले विचार रुजवणं हे जबाबदारीचं काम तुम्ही करता, सुदृढ विचार पोचवता यामुळे हा व्यवसाय आनंदाचा भाग बनतो.
जोखीम ः
• स्थिरता येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यासाठी संयमाची अत्यंत आवश्यकता.
• पुस्तकं विकत घेण्याची मानसिकता कमी असल्यामुळे त्याचा परिणाम या व्यवसायावर होतो.
• इतर स्पर्धक प्रकाशक असल्यामुळे पुस्तकांचे विषय, परिपूर्णता याविषयी सजग असायला हवं.
• कमीत कमी १००० प्रती काढणं आवश्यक असतं अन्यथा ते पुस्तक किफायतशीर पडत नाही.
तुम्हालाही हा व्यवसाय करायला आवडेल? तुम्ही आशिशशी संपर्क करू शकता.
आशिश पाटकर
manovikaspublication@gmail.com
- दीपा देशमुख
Add new comment