डॉ. अनिल अवचट
पत्रकार, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ता, बासरीवादक, ओरिगामीकर्ता, चित्रकार, फोटोग्राफर, काष्ठशिल्पकार, मनस्वी गायक, समाजाचं पालकत्व स्वीकारलेला एक पिता अशा अनेक अंगांनी अनिल अवचट यांची ओळख होते. एकाच माणसातल्या या अनेक कलागुणांना आणि वैशिष्ठ्यांना जाणून घेताना समोरच्याची दमछाक होते, हा माणूस अपनी धुनमे मगन ही रहना अशा अवस्थेत असतो.
अनिल अवचट यांचं बहुतांश लिखाण सामाजिक भान ठेवून केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात तर सतत भटकंती करून घेतलेले त्यांचे अनुभव खूपच दाहक आहेत. त्यात देवदासींचं आयुष्य, खाणकामगारांचं आयुष्य, भोंदू बाबा,यावर झालं. अंधश्रद्धा, कर्मकांड यांना दूर सारून कसं जगता येतं याबद्दल त्यांचं जगणं बोलत राहतं. त्यांची कविता बोलत राहते. त्यांच्या चित्रातून निसर्ग बोलतो, फोटोंमधून, काष्ठ शिल्पातून माणसं एकमेकांशी संवाद साधताना भेटतात. त्यांच्या ओरिगामीतून लहान मुलं त्यांच्याकडे धाव घेतात. त्यांच्यातल्या बासरीच्या सुरानं ते परक्याला आपलंसं करतात. असा हा माणूस, याचं लिखाण आणि सगळेच छंद तुमचे आमचे सुपरहिरो मालिकेतून वाचकांच्या समोर येतात.
Comments
Can I read
Can I read
Add new comment