डॉ. आनंद नाडकर्णी
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यावर लिहिलेलं तुमचे आमचे सुपरहिरो मालिकेतलं दुसरं पुस्तक! अखंडपणे कोसळणारा उत्साहाचा खळाळता धबधबा म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! एक मानसशााज्ञ असून हा माणूस इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो की थक्क व्हायला होतं. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम होतात.
जीवनकी पाठशाला म्हणजेच वेध हा उपक्रम महाराष्ट्रातल्या १० शहरांमधून संपन्न होतो. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच या कार्यक्रमात सहभागी होतात आणि नवीन बळ, नवीन प्रेरणा घेऊन बाहेर पडतात. जगण्याच्या बाबतीत हतबलता आलेल्या व्यक्ती आयपीएचच्या हेल्पलाईनला आपलं नाव न सांगता कधीही फोन करू शकतात आणि दिलासा मिळवू शकतात. डॉ. आनंद नाडकर्णी यांची महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विनोबा यांसह अनेक व्याख्यानं यू-ट्यूब वर उपलब्ध आहेतच, त्याशिवाय त्यांचे जाहीर कार्यक्रमही होत असतात. आजच्या सतत तणावाखाली वावरणार्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी विवेकनिष्ठ विचारांचा वारसा देण्यासाठी डॉक्टरांनी आरईबीटी रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरॅपी नावाचा कोर्स तयार केलाय. यातही किमान दहावी पास झालेल्या व्यक्तीपासून कोणीही सहभागी होऊ शकतो. या कोर्समुळे स्वतःला तणावमुकत करून आनंदी जीवन जगता येतंच पण इतरांनाही या थेरॅपीचा फायदा करून देता येतो. हा माणूस नाटक लिहितो, चित्रपटाचं लिखाण करतो. छानशी गाणी रचतो, चित्रं काढतो. थोडकयात कुठलाही विषय या माणसाला वर्ज्य नाही.
असे डॉ. आनंद नाडकर्णी घडले कसे, त्यांच्या आयुष्यातल्या शारीरिक आणि इतर अडचणी, त्यांच्याशी त्यांनी कसा सामना केला. हे सगळं या पुस्तकातून उलगडतं. सतत कार्यमग्न राहा. चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. चांगल्या कामाचा ध्यास घ्या हे ते सांगत नाहीत, तर त्यांचं जगणं सांगत राहतं.
Add new comment