डॉ. प्रकाश आमटे
डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे बघितलं की त्यांच्यातल्या माणुसपणाची, ओळख पटते. आज जगभरात नाव असलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात अतिशय साधं राहणारी! खरं तर गांधीजीं आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यातलं एक साम्य मला प्रकर्षानं जाणवतं. भारतातली गरिबी बघून गांधीजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी फक्त पंचा हेच आपलं वा असं ठरवलं आणि आयुष्यभर ते पंचार राहिले. त्याचप्रमाणे डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींचं थंडी-वार्यातलं जगणं बघितलं, त्यांची गरिबी बघितली आणि त्यांना घालायला अंगभर वांही नसताना आपण मात्र संपूर्ण अंगभर पेहराव करायचा त्यांच्या मनाला रुचेना आणि त्यांनी खादीची पांढरी चड्डी आणि बनियन, ज्याला अपण बंडी म्हणूया असा पोशाख घालायला सुरुवात केली. अगदी कुठलाही पुरस्कार स्वीकारायला ते गेले तरी त्यांनी त्यांनतर कधीही सुटबूट घातला नाही. खादीचा कुर्ता आणि पायजमा हा पोशाख इतरत्र असताना आणि हेमलकशात मात्र चोवीस तास चडडी आणि बनियन!
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासींचं आरोग्य सुधारण्यासाठी समर्पित केलं आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या शिक्षणासाठी ते झटत आहेत. त्यांचं प्राणिप्रेम तर सगळ्या जगानं पाहिलं आहे. वाघ असो वा विषारी नाग, डॉक्टर प्रकाश आमटेंना ते कुठलीही इजा प्रोहोचवत नाहीत, उलट ते त्यांच्याबरोबर कुटुंबातला सदस्य असल्यागत वागतात.
अनेक पुरस्कार प्राप्त करूनही हा माणूस तितकच विनम्र आणि साधा आहे आणि त्यांची जी जडणघडण झाली, त्यांनी जे काम उभं केलं याचीच ओळख या तुमचे आमचे सुपरहिरो या पुस्तकातून होते.
Add new comment