Movie Reviews

गजेंद्र अहिरेचा डिअर मोली!!!

गजेंद्र अहिरेचा डिअर मोली!!!

सभोवताली सर्वत्र कोवळं पोपटी ताजं गवत....समोर पहुडलेला शांत जलाशय....पाण्याचे तरंग देखील आपला आवाज येणार नाही ना याची काळजी घेत असावेत, असं शांत, निःशब्द वातावरण आणि त्या चित्रातलाच एक भाग बनून जावी अशी गुरबानी गील नावाची एक गोड तरुणी! हे चित्र आताही मनावर ठसलेलं आहे.....आज फिल्म अर्काइव्ह इथं कल्याणच्या फोनमुळे जाणं झालं आणि एका सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेता आला. राष्ट्रीय स्तरावर चित्रपटांना पुरस्कार मिळवणारा गजेंद्र अहिरे हा दिग्दर्शक! त्याचाच डिअर मोली हा चित्रपट आज बघायचा होता. वेळेत पोहोचले, तेव्हा गजेंद्र अहिरे स्वागताला समोर उभे होते. त्यांच्याशी बोलून लगेच डॉ. पुढे वाचा

बाकी इतिहास

बाकी इतिहास

बाकी इतिहास मूळ बंगाली भाषेतलं ‘बाकी इतिहास’ हे बादल सरकार लिखित नाटक हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं. आज सुदर्शनला हे नाटक बघण्याची संधी मिळाली. १९२५ साली जन्मलेला बादल सरकार हा हरहुन्नरी मनुष्य एक अभिनेता, एक नाटककार, एक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होताच, त्याचबरोबर शिक्षणानं तो सिव्हिल इंजिनिअर होता. शिकत असतानाच बादल सरकारांवर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडला. भारतामध्ये ज्या दिग्गज नाटककारांचं नाव घेतलं जातं, त्यात मोहन राकेश, विजय तेंडूलकर, गिरीश कर्नाड अशा नावांबरोबरच बादल सरकार हे नाव त्यात सामील झाल्याशिवाय नाटकाचा इतिहास पुढे सरकू शकत नाही. पुढे वाचा

फारच टोचलंय

फारच टोचलंय

सुदर्शन हॉलचा परिसर गर्दीनं फुलून गेलेला. मी जरा धास्तावलेच, म्हटलं आता हॉलमध्ये जाण्यासाठी आणि पहिल्या रांगेत जागा मिळवण्यासाठी काय करावं लागेल कुणास ठाऊक? त्यातच आपल्या कमी उंचीमुळे आपल्याला मागून दिसणार नाही ते वेगळंच. मात्र अपूर्वनं काळजीनं माझ्या मनातलं ओळखून आधीच जागा पकडून ठेवल्यामुळे मी हुश्श केलं. आज धनूच्या दीर्घांकासाठी खूपच गर्दी म्हणजे अगदी जत्राच भरली होती. सातारा, वाई, औरंगाबाद, कणकवली असे कुठून कुठून नाट्यवेडे धनूसाठी आज आले होते. माझी शरद, ज्योती, वसंत/माधुरी दातार, चैतू, अनिरूद्ध, सुयश, संगीता, नुपूर, मंजू आणि अनेकांशी भेट झाली. पुढे वाचा

अतुल पेठेंची शब्दांची रोजनिशी

अतुल पेठेंची शब्दांची रोजनिशी

दिग्दर्शक अतुल पेठे या नाट्यकर्मीच्या प्रेमाखातर आज ठरवून रामू रामनाथन लिखित आणि अमर देगावकर अनुवादित 'शब्दांची रोजनिशी' हे नाटक बघण्यासाठी प्रयोगस्थळी पोहोचले. काहीच वेळात हॉलमध्ये प्रवेश केला आणि समोर असलेल्या पडद्यावर ज्याला आपण प्रगती म्हणतो त्याची प्रतीकं दिसायला लागली. उंचच उंच इमारती, उड्डाणपूल, त्यावरून धावणार्‍या गाड्यांची संख्या असं बरंच काही.....ही भित्तीचित्र जयंत भीमसेन जोशी यांनी काढलेली आहेत. नाटकाविषयी बोलण्याआधी थोडं इतर, पण महत्त्वाचं. आपल्याकडे इंग्रजाचं राज्य आलं, अनेक बदल घडले. त्यांनी इंग्रजीची रुजवणूक काही प्रमाणात केली. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. पुढे वाचा