Movie Reviews

ॲस्पिरन्टस्

ॲस्पिरन्टस्

स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परिक्षार्थी यांच्यावर आधारित ॲस्पिरन्टस् ही मालिका 7 एप्रिल 2021 पासून यू ट्यूब वर सुरू झाली असून आत्तापर्यंत या मालिकेचे 3 भाग प्रदर्शित झाले आहेत. टीव्‍हीएफ (द व्हायरल फीवर) चॅनेलने ॲस्पिरन्टस्ची निर्मिती केली असून या आधी त्यांनी कोटा फॅक्टरीसारखी मालिका प्रदर्शित करून शिक्षणक्षेत्रातल्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. ॲस्पिरन्टस् म्हणजे महत्वाकांक्षी - स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे लाखो तरुण आपण यूपीएसी परीक्षेत यश मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रवेश घेऊन जीवतोड अभ्यास करतात. पुढे वाचा

शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

७२ वर्षांची उपमा नावाची एक निवृत्त शिक्षिका कलकत्यातल्या एका जुन्या घरात राहत असते. वृध्दावस्थेमुळे प्रकृतीची कुरबुरी सुरू असतात. तिची देखभाल करण्यासाठी काम करणारी मध्यमवयीन नोमिता नावाची एक स्त्री असते. रटाळ असं आयुष्य सुरू असतं. उपमाकडे बघून, तिच्या चेहऱ्यावरच्या चिंता पाहून हिचं पुढलं आयुष्य देखील कमी होईल असं वाटत असतं. उपमाचा एकुलता एक मुलगा सौम्या आपल्या बायकोबरोबर वेगळा राहत असतो. अर्थात तिच्या देखभालीसाठी जो काही खर्च लागेल तो करत असतो. सुरुवातीला दर आठवड्याला येऊन भेटून जाणारा सौम्या सहा महिन्याचं अंतर पडलं तरी भेटलेला नसतो आणि उपमालाही त्याच्या भेटण्याची गरज वाटेनाशी होते. पुढे वाचा

पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम!

पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम!

अरुणाचलम मुरुगनंथम! भारतातल्या तामिळनाडू राज्यातल्या कोईम्बतुरमधल्या अरुणाचल मुरुगनंथम या तरुणानं भारतातले २३ राज्यात आणि १०६ देशांमध्ये आपली सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन तयार केली आणि पोहोचवली आणि अतिशय स्वस्त दरात स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची सुविधा निर्माण केली. स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला. पुरेसं शिक्षण नसतानाही केवळ स्त्रियांचं दुःख न बघवलं गेल्यानं मुरुगनंथमनं एकच ध्यास घेतला, पदोपदी वाट्याला अपमान, कुचेष्टा, उपेक्षा आणि बदनामी आली. पण तो काम करतच राहिला आणि अखेर आपल्या ध्येयप्राप्तीत तो यशस्वी झाला. पुढे वाचा

थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!!

थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!!

मिणमिणता दिवा.....कधी विझेल तो त्याचा नेम नाही........दहा बाय दहाची खोली आणि त्या खोलीत एका कोपर्‍यात बसलेला साध्याशा कपड्यातला तरूण....बहुतेक हा गावाकडला असावा....पुढे कधीतरी शहरात जाऊन स्थिरावला असावा असा अंदाज मी मनाशी बांधत होते........तो संवाद साधायला लागला आणि कळलं की तो एका चिमुकल्या गावातलाच मुलगा....तो आणि त्याचा भाऊ ....त्यांच्या कितीतरी आठवणी.....भाऊ काही शिकला नाही, रानात बकर्‍यांना चरायला नेत राहिला...मोठा झाल्यावर शेती करत राहिला.....आणि हा माझ्यासमोर बसलेला तरूण मात्र मोठ्या भावाच्या प्रोत्साहनानं शिकला.......भावानं त्याच्या शिक्षणात कुठलीच अडचण येऊ दिली नाही.........शिकून सव पुढे वाचा