कोकण प्रवास
11आणि 12 मे डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे बरोबर कोकण प्रवासात गेले. सुपरहीरो मालिकेत मी प्रकाश आमटे यांच्यावर लिहिल होत त्यांच्याशी दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेट आणि बोलणही झाल होत. पण या दोन दिवसात पद्मश्रीने गौरविलेल्या, मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेल्या एका आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या व्यक्तीला मी आणखी जवळून बघत होते.
कोकण उन्हाळ्यातही खूप हिरवगार आणि सुन्दर दिसत होतच पण घाट मात्र धड़की भरवत होते. आम्ही एळवण, उबर्डे आणि सांगुळवाडी या छोट्या गावातून फिरलो. कोकणातल्या लोकांना आमटे पतिपत्नीना भेटून खूप आनंद झाला होता. त्यातच दोघांच साधेपण लोकांच्या मनावरच दडपण घालवत होत. मी तर माझा मोठा भाऊ असता तर असाच असता इतकी त्यांच्यात मिसळून गेले. मंदाताई तर सगळ्या विषयांवर भरभरुन बोलत होत्या. परकेपण औषधालाही नव्हतं.
मंदाताई च नुकतंच दोन्ही डोळ्यांच ऑपरेशन झाल होत पण गावातल्या उत्साही स्त्रियांना कुंकू लावताना त्यांनी मना केल नाही. त्यांच्या भावनांचा आदर केला. गाडीत आम्ही तिघे आणि ड्राइवर इतकेच जण होतो. दर दोन तासानी डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या बायकोच्या डोळ्यात आठवणीने ड्रॉपस टाकत होते. न बोलताही दोघांच् एकमेकांना जपण दिसत होत. सतत सुरु असलेल्या प्रवासान थकवा असूनही त्यांनी एकदाही कपाळावर आठी आणली नाही. प्रत्येकाशी तितक्याच् आत्मीयतेन् वागण, न खाण्याचा न राहन्याचा सोयींबद्दल आग्रह वा हेच आणि असंच पाहिजे असा अट्टाहास मी पाहिला. खरी मोठी माणस अशीच असतात म्हणून बहुधा लोक त्यांना देवत्व देत असावेत. या दोन दिवसांनी खूप काही भरभरुन दिल. Thanks dr prakash and Mandakini Amte.
Add new comment