जयप्रद

जयप्रद

तारीख

२०११ मध्ये सकाळ मध्ये मी जयप्रद वर लिहिलेला छोटासा लेख !!!! जरूर वाचा !!!
हमारी मुठ्ठीमे आकाश सारा.........जयप्रद देसाई.
सिनेमा हे अत्‍यंत खर्चिक प्रकरण आहे ‘ये अपने बसकी बात नही....'असा विचार करताना सिनेमा बनवणं हे तुम्‍हा-आम्‍हा कोणालाही शक्‍य आहे.... असं जर मी म्‍हटलं तर ?...खरं नाही ना वाटत? जयप्रद देसाई या तरुणाने ते खरं करुन दाखवलंय.
मुंबईचा जयप्रद हा कम्‍प्‍युटर विषय घेऊन इंजिनियर झाला. कॉलेजला असताना जयप्रदला डोस्‍टोव्‍हस्‍की, निकोलाई गोगोल, चेकॉव्‍ह, काफ्का आवडू लागले. त्‍याने काही जाहिरातींसाठी मॉडेलिंगही केलं. फिल्‍म्‍ क्षेत्रात रस निर्माण झाल्‍याने अमर दामले यांच्‍या पुढाकाराने स्‍पंदन नावाचा एक ग्रुप निर्माण झाला. स्‍पंदन हा 150 अशा स‍मविचारी सिनेमावेडयांचा गट आहे. 
सामान्‍य माणूस कमी खर्चात सिनेमा बनवू शकतो या विश्‍वासाने साधा डिजिटल कॅमेरा घेऊन शॉर्ट फिल्‍म बनवण्‍याचं काम सुरु झालं. अनेक कार्यशाळा स्‍पंदनद्वारा घेण्‍यात आल्‍या. आपण फिल्‍ममधली तंत्र नीट समजून घेतली पाहिजेत या विचारानं जयप्रद न्‍यूयॉर्कला  ‘मास्‍टर ऑफ फाईन आर्ट’ करण्‍यासाठी रवाना झाला. 
न्‍यूयॉर्कमध्‍ये जपान, ब्राझील, आखाती देशातून आलेले अनेक विद्यार्थी होते. प्रत्‍येकाचं स्‍वतःचं  जग आणि इतकी एकत्रं आलेली वेगळी जगं पाहून जयप्रद स्मिमित झाला. इथे जगभरातले सिनेमे त्‍याला अभ्‍यासता आले. जयप्रदने ‘रोज बुश' ही पहिली फिल्‍म आपल्‍या प्रोजेक्‍ट अंतर्गत बनवली. ‘डीपर यू गो, हायर यू रिच' हा मंत्र तो शिकला. या फिल्‍मला उत्‍कृष्‍ट स्‍क्रीन प्‍ले,  मोस्‍ट प्रॉमिसिंग फिल्‍मचं राष्‍ट्रीय स्‍तरावरची अॅवार्डस मिळाली. एका जीवावर बेतलेल्‍या आजारपणानंतर काहीच दिवसात ‘हम होंगे कामयाब' म्‍हणत जयप्रदने हे असाध्‍य काम सिद्ध्‍ करुन दाखवल होतं. 
एक दिवस जयप्रदला निर्माण उपक्रमाची माहिती मिळाली. त्‍याचवेळी त्‍याने अनिल अवचट यांचं ‘कार्यरत' वाचलं. आणि माझी संवेदनशीलता भारतीय मनाची आहे, मला माझ्या लोकांच्‍या गोष्‍टी त्‍यांना सांगायच्‍या आहेत ही भावना प्रखर होऊ लागली. परदेशातून परतल्‍यावर निर्माणमध्‍ये दाखल झालेल्‍या जयप्रदला ‘सामाजिक कार्य करताना संवेदनशील असायला हवं पण त्‍यात वाहून जाता कामा नये’ या गोष्‍टीची जाणीव झाली.  
जयप्रदने  निर्माणची फेलोशिप घेतलेल्‍या पाच उच्‍चशिक्षित युवांचा प्रवास ‘निर्माण' फिल्‍ममध्‍ये चित्रित केला. गडचिरोलीच्‍या नक्षलाईट भागापासून ते धडगावसारख्‍या दुर्गम आदिवासी भागातही जयप्रद भर उन्‍हात कॅमेरा घेऊन फिरत होता. याच दरम्‍यान ‘स्‍वराज्‍य' ही मराठी फिल्‍मही तो करत होता. रेणू गावस्‍करांसोबत हिंदी फिचर फिल्‍म करतोय. तसंच मेधा पाटकरांसोबत आदिवासी मुलांच्‍या जीवनशाळा अभ्‍यासताना तिथल्‍या मुलांसोबतही कार्यशाळा घेतल्‍या. त्‍याचवेळी  यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठानदृवारे औरंगाबादमधल्‍या बशर नवाज या उर्दू शायरीच्‍या  महान हस्‍तीवर फिल्‍म करायची ऑफर आली. ‘या प्रत्‍येक फिल्‍मनंतर नव्‍या जन्‍माचा  अनुभव मला येतो' असं जयप्रद म्‍हणतो. 
स्‍पंदनच्‍या पुढाकाराने मुंबईला निर्माणच्‍या ऑफीसमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून फिल्‍म क्‍लब सुरु आहे. ‘कुठलाही चांगला सिनेमा हा सामाजिक संदेश देतो' असं तो आवर्जून सांगतो. सत्‍यजीत रेचा प्रभाव असणा-या जयप्रदला राजकपूर, विजय आनंदसारखे दिग्‍दर्शक आवडतात. 
आज ‘स्‍पंदन'सोबत  अनेक मध्‍यमवर्गातले युवा जोडले जात आहेत. ‘हमारी मुठ्ठीमे आकाश सारा' म्‍हणणा-या जयप्रदबरोबर  तुम्‍हालाही बनवायचीय फिल्‍म ?
दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.