पावसाचंही गुगलिफाय, कार्यक्रम न होताही भेटवस्तू प्रदान.

पावसाचंही गुगलिफाय, कार्यक्रम न होताही भेटवस्तू प्रदान.

तारीख

- दीपा कसा झाला कालचा वेध कट्यावरचा कार्यक्रम?
- काय झालं ना, मी घरातून निघाले, तेव्हा बारीक झिमझिम पाऊस सुरू होता
- हो, पण कार्यक्रम कसा झाला...
- पोहोचायला साडेपाच वाजले, पाचच मिनिटांत धनू आणि चैतू देखील आले
- हो, पण कार्यक्रम कसा झाला...
- दोघंही चिंब भिजले होते, ठरवल्यानुसार आम्ही काळ्या रंगाचे कपडे घातले होते.
- हो पण कार्यक्रम वेळात सुरू झाला ना, की थोडा उशीर झाला?
- किरकोळ म्हणून बघावं, तो पाऊस मुसळधार, राक्षसी स्वरूपात कोसळू लागला....
- मग
- तेवढ्यात रेनकोट, छत्रीसह पूर्ण भिजून शंकर आला, सुयश आला....झालंच तर...
- किती लोक आले?
- तेवढ्यात पळशीकर सरांनी गरमागरम भजी मागवली
- कार्यक्रमाचं काय?
- आम्ही भजी खाल्ली, दोनदा चहा झाला....
- हो पण कार्यक्रम?
- पळशीकर सरांनी आणि प्रदीप कुलकर्णी यांनी चैतुला आणि मला भेटवस्तू देखील दिली
- का...
- कार्यक्रम ना? तो कसा होणार? पावसानं कोणाला येऊच दिलं नाही. त्यानं चैतुऐवजी स्वतः एकट्यानंच 'गुगलिफाय सादर केलं!’
दीपा देशमुख, पुणे
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.