अरविंद गुप्ता भेट
आज संध्याकाळी अरविंद गुप्ता यांच्या घरी गेलो असताना नेहमीप्रमाणे पुस्तकांवर खूप खूप गप्पा झाल्या. त्यांना जिनियस आणि कॅनव्हास द्यायचं होतं. जिनियस आणि कॅनव्हास बघून त्यांना खूपच आनंद झाला. आम्ही पुढच्या पुस्तकांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी काही पुस्तकं आम्हाला भेट दिली. अनिल अवचट यानेकी बाबाचं मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकाचा हिंदी अनुवादही त्यांनी नुकताच केलाय. मस्त झालंय पुस्तक!!!! सतत आनंदी, उत्साहाने भरलेला, नितळ आणि निर्व्याज मनाचा असा पुस्तकवेडा माणूस कदाचित दुसरा शोधून सापडणार नाही. त्यांना भेटलं की एक नवी ऊर्जा मिळते. सुपर हिरो या मालिकेत त्यांच्यावर मला पुस्तकरूपात लिहायला मिळालं याचा मला अतिशय अभिमान वाटतो.
Add new comment