इति-आदि
तीन-चार दिवसांपूर्वी कुरियर आलं. कुरियर म्हणजे पुस्तकं आली हे मनात पक्कं ठसलेलं आहे. अतिशय व्यवस्थित पॅकिंग केलेल्या त्या पुठ्यातून पुस्तक बाहेर काढायला मला वेळच लागला. मात्र आतलं पुस्तक हातात पडलं, तेव्हा, 'वाह, क्या बात है' असे उ्दगार नकळत बाहेर पडले. रोहन प्रकाशनाची देखणी निर्मिती असलेलं आणि अरूण टिकेकर यांनी लिहिलेलं ‘इति-आदि’ हे पुस्तक दिमाखदारपणे माझ्या हातात विसावलं. या पुस्तकात काय बरं असेल? अरूण टिकेकर या लेखकानं लिहिलेलं म्हणजे काहीतरी गंभीर, विचार करायला लावणारं असं पुस्तक असेल का, असाही प्रश्न मनाला पडला. पुढे वाचा