Book Reviews

विवेक प्रकाशन, राजीव तांबे आणि अय्या खरंच की....

विवेक प्रकाशन, राजीव तांबे आणि अय्या खरंच की....

'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलेलं अक्षरशः खरं आहे आणि हा अनुभव मी रोजच घेते. पुण्यातलं सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण असेल, पुण्यातल्या सफाई कामगारांची (पाट्या न टाकता) भल्या पहाटे शहराची केलेली सफाई असेल यासारख्या लक्षात घ्याव्यात अशा अनेक गोष्टींची यादी वाढतच जाणारी......तर या पुण्यात राहत असताना आपल्याला रावणासारखी दहा डोकी असती, दहा शरीरं असती तर  मग आपण पुण्यात रोज होणार्‍या निदान दहा तरी कार्यक्रमांना हजेरी लावली असती असं सारखं वाटत राहतं. प्रत्यक्षात मात्र एका वेळी एकाच कार्यक्रमात सहभागी होता येतं. (आणि या गोष्टीचं खूप खूप वाईटही वाटतं. पुढे वाचा

लव्‍ह इन द टाईम ऑफ करोना

लव्‍ह इन द टाईम ऑफ करोना

अतिशय कठोर असा पोलीस अधिकारी राणे, त्याच्या तुरुंगात अनेक गुन्हेगारांना कोरोनाची लागण झालेली असते. हे सगळे गुन्हेगार बरीच दीर्घ शिक्षा भोगत असतात, त्यातला एक गुन्हेगार बलात्काराच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो. शिक्षेचा काही कालावधी शिल्लक असतो. अशा वेळी राणे त्याला तुझी तुरुंगातून सुटका करतो असं सांगत त्याला बाहेरच्या जगात गेल्यावर २ लाख रुपये देखील देण्याचं कबूल करतो. त्याबदल्यात त्यानं एका स्त्रीवर बलात्कार करायचा असतो. विशेष म्हणजे ही स्त्री दुसरीतिसरी कोणी नसून राणेची सुंदर, देखणी अशी बायको असते. राणेला या बलात्कारानं आपल्या बायकोलाही कोरोना पॉझिटिव्‍ह करायचं असतं का, तसं असेल तर का? पुढे वाचा

दशम्या

दशम्या

'परतवारी'नंतर आलेलं सुधीर महाबळ या लेखकाचं दुसरं पुस्तक म्हणजे 'दशम्या'! 'दशम्या' म्हणजे प्रवासाला जाताना घरातल्या स्त्रीनं काळजीनं, मायेनं प्रवासासाठी बरोबर दिलेली शिदोरी. आयुष्याच्या प्रवासात लागणार्‍या अनेक वाटा....कधी पाऊलवाटा, कधी आडवळणाच्या वाटा, कधी चढउताराच्या वाटा, कधी उन्हाचे चटके देणार्‍या वाटा, तर कधी हलक्याशा झुळकेनं तनामनाला गारवा देणार्‍याही वाटा.....अशा वाटांवर अनुभवांची, भेटलेल्या माणसांची, आपण बघितलेल्या स्वप्नांची, आपल्या मूल्यांची, आपल्यावर झालेल्या संस्कारांची सोबत असते. या वाटेवरचे काही अनुभव, काही माणसं कळत-नकळत खूप काही देऊन जातात. पुढे वाचा

हमरस्ता नाकारताना.....

हमरस्ता नाकारताना.....

अनेक दिवसांपासून ज्या पुस्तकाची प्रतीक्षा होती, ते अखेर काल प्रत्यक्ष लेखिकेकडून हातात पडलं. सध्याचं पावसाचं बेभरवशी वातावरण असताना, सरिता ( आवाड)नं घरी येऊन अत्यंत आत्मीयतेनं तिचं आत्मचरित्र ‘हमरस्ता नाकारताना’ मला भेट दिलं. सरिताच्या बाबतीत बोलताना....काही लोकांशी ओळख झाल्यावर मला पहिल्याच भेटीत परकेपणा जाणवला नाही, ना वयाचं अंतर! त्यात मुक्ता मनोहर, गीताली वि.म. आणि आता सरिता आवाड! माझ्यापेक्षा सर्वदृष्टीनं या तिघी मोठ्या असूनही मी त्यांना अगतुगनेच बोलते. त्यांच्याशी ती औपचारिकता कधी पाळावीच वाटली नाही. त्यांचं अंतर्बाह्य पारदर्शी असणं मला जास्त भावलं.  पुढे वाचा