Book Reviews

शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!

शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!

रिचर्ड फाईनमन या अवली शास्त्रज्ञानं लिहिलेलं आणि माधुरी शानबाग यांनी अनुवादित केलेलं मधुश्री पब्लिकेशनचं ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!’ या पुस्तकाची मी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. नुकतंच हे पुस्तक हातात पडलं. हे पुस्तक लिहिणारा रिचर्ड फाईनमन हा अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ! जन्मानं ज्यू असला तरी मानवता हाच धर्म मानून त्यानं विज्ञानावर आयुष्यभर प्रचंड प्रेम केलं. रिचर्ड फाईनमन हा आपलं अस्थिर आणि वादळी आयुष्य, भरकटलेपण, पारदर्शी स्वभाव, खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, बोलकी चित्रकारिता घेऊन जगासमोर आला. पुढे वाचा

एबारो बारो - सत्यजीत रे - अनुवाद विलास गिते

एबारो बारो - सत्यजीत रे - अनुवाद विलास गिते

एबारो बारो - सत्यजीत रे - अनुवाद विलास गिते
कालपासून 'एबारो बारो' हा सत्यजित रे (राय) यांचा कथासंग्रह ज्याचा अनुवाद विलास गिते यांनी केला आहे वाचत होते. ‘एबारो बारो’ म्हणजे आणखी बारा! साकेत प्रकाशनानं १९९२ साली प्रकाशित केलेला हा अनुवाद आजही तितकाच ताजा वाटतो. विलास गिते यांची आणि आमची (मी आणि अच्युत गोडबोले) भेट अहमदनगर इथे एका कार्यक्रमात झाली होती. ते आमच्या कार्यक्रमाला आवर्जून आले होते. त्यांची ओळख आयोजकांनी जेव्हा करून दिली, तेव्हा त्यांचं साधेपण बघून मी थक्क झाले. खरं तर त्या भेटीत त्यांनी प्रेमानं ‘एबारो बारो’ हे पुस्तक भेट दिलं होतं. पण वाचायला अखेर आज उजाडला. पुढे वाचा

हरित द्वीपाचा राजा - सुनील गंगोपाध्याय

हरित द्वीपाचा राजा - सुनील गंगोपाध्याय

हरित द्वीपाचा राजा आजचा बालदिन साजरा करण्यासाठी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग मनोविकास निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं. सुनील गंगोपाध्याय हे नाव कुणाला माहीत नाही असा वाचक सापडणं विरळाच. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशा या लेखकाच्या ११ साहित्यकृतींवर चित्रपट निघालेत. सत्यजीत रे यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही त्यांच्या दोन कादंबर्‍यांवर चित्रपट काढण्याचा मोह आवरला नाही. २०० हून अधिक पुस्तकं लिहिणारा हा लेखक मला अतिशय आवडतो. पुढे वाचा