फिर वही तलाश
काही पोस्ट स्वतःसाठी च लिहिलेल्या असतात...गेले कित्येक महिने ही मालिका पुन्हा आठवते आहे.....
फिर वही तलाश
कभी हादसोंकी डगर मिले, कभी मुश्किलोंका सफर मिले
ये चराग है मेरी राह के मुझे मन्जिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे, मै रुकू जहाँ कोई हाथ दे
मेरी मन्जिले अभी दूर है, मुझे रास्तोंकी तलाश है
दिल्ली दूरदर्शनवर एक से एक मालिका सुरू असण्याचा तो काळ होता. हम लोग, अन्वेशन, तमस अशा कितीतरी सुरेख मालिका बघून डोळे, कान, मन तृप्त होत असे. त्यातलीच १९८९-९० च्या दरम्यानची फिर वही तलाश ही मालिका....रेवती सरन शर्मा यांनी लिहिलेली होती, तर या मालिकेचं दिग्दर्शन लेख टंडन यांचं होतं. शीर्षक गीत चंदन दास यांच्या आवाजातलं तर हे गीत शबाब मेरठी यांनी लिहिलेलं होतं. शीर्षक गीत सुरू झालं की सगळी कामं सोडून मन तो भाग बघण्यात गुंग होवून जायचं.
एक हळुवार प्रेमकथा यात चितारली होती. तसंच दोन मैत्रिणींची घट्ट मैत्रीही अतिशय सुरेखरीत्या पूनम आणि निलीमा अजीम यांनी साकारली होती. हिमानी शिवपुरीची भूमिकाही यात लक्षात राहण्यासारखी होती. या मालिकेतले चढ-उतार अनुभवण्यासाठी प्रत्येक एपिसोडची उत्कंठेनं वाट बघितली जायची. ती पात्रं अभिनय करतच नाहीयेत, तर खरोखरंच त्यांच्या आयुष्यात हा संघर्ष सुरू आहे असं वाटायचं. त्या प्रेमिकांच्या भेटीनं गालावर गुलाब उमलायचे, तर त्यांच्या ताटातुटीनं डोळ्यातून अश्रू वाहत राहायचे. यातलं हे युगुल गीत मालिका संपली तरी ओठांवर रेंगाळत राहायचं.
मेरे हमसफर मेरे साथ तुम सभी मौसमोंमे रहा करो,
कभी दर्द बनके गिरा करो, कभी बुँद बनके गिरा करो,
मेरे पास आओ जो तुम कभी, कही धूप हो कही छाँव हो
कभी आरजू की तपीश बनो, कभी गेसुओं मे छिपा करो
जो है ख्वाब मेरे खयाल के उन्हे रख ना जाये संभाल के
कभी याद मेरी जो आये तो, कोई रंग उन मे भरा करो
आजही या मालिकेचं शीर्षक गीत ओठांवर आलं की ते दिवस आठवतात अणि मन पुन्हा म्हणतं,
मेरी मन्जिले अभी दूर है मुझे रास्तोंकी तलाश है
दीपा देशमुख, पुणे
Add new comment