बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या प्रथेची गोष्ट :  सती प्रथा आणि राजा राममोहन रॉय

बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या सती प्रथेची गोष्ट

सतीची प्रथा हे शब्द समोर आले की राजा राममोहन रॉय (२२ मे १७७२-२७ सप्टेंबर १८३३) यांचं नाव डोळ्यासमोर येतं. तसंच सतीविषयी बोलायचं झालं तर मराठी वाचकाला चटकन रणजीत देसाईंची ‘स्वामी’ ही कादंबरी देखील लगेचच आठवते. या ऐतिहासिक कादंबरीची पार्श्वभूमी खूपच वादळी आणि राजकीय परिस्थितीत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. लोक स्वातंत्र्याचा श्वास घेत मुक्त, निर्भय जीवन जगू लागले. मात्र १६८० ला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी याला शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्याची धुरा सांभाळता आली नाही. पुढे वाचा

खून, हत्त्या, कत्ल, मर्डर.....

खून, हत्त्या, कत्ल, मर्डर.....इत्यादी दिवाळी 2019

‘खून’ या शब्दाची उत्पत्ती फारसी भाषेतून झाली. याचा अर्थ रक्त, रुधिर, कत्ल आणि हत्या असा होतो.  खून म्हणजे एक जीव जगातून नष्ट करणे. असं करण्याची भावना मनात कशी जन्म घेत असावी? जन्म-मृत्यूच्या खेळात कधी स्वतःच्या आयुष्याचा वीट आल्यानं, नाईलाज झाल्यानं, दुर्धर प्रसंग कोसळ्यानं, आर्थिक हतबलता आल्यानं, वैफल्य आल्यानं काही लोक स्वतःहून मृत्यूला कवटाळतात आणि आपलं आयुष्य संपवतात. सानेगुरूजींपासून ते गुरूदत्तपर्यंत आणि व्हॅन गॉघपासून ते हेमिंग्वेपर्यंत, हिटलर पासून फ्रॉईडपर्यंत, या सगळ्यांनी मृत्यूला आपलंसं केलं आणि आपलं जीवन संपवलं. पुढे वाचा

प्रभाव पाडणारी पुस्तकं - स्पर्श ज्ञान दिवाळी २०१

प्रभाव पाडणारी पुस्तकं - स्पर्श ज्ञान दिवाळी २०१९

कळायला लागलं तसा पुस्तकांन आयुष्यात प्रवेश केला, मी पकडलेलं त्यांचं बोट त्यांनी कधी सोडलं नाही हे विशेष! प्रवास कसाही असो, चढ असो वा उतार....ही पुस्तकं मूकपणे सोबत करतच राहिली. लिहिणं-वाचणं येण्याआधी गोष्टींच्या रुपातून त्यांनी माझ्याशी मैत्री केली. माझा औंदुबर नावाचा एक मावसभाऊ होता. मूळात औंदुंबरच धिप्पाड शरीरयष्टीचा, सावळ्या वर्णाचा, उंचापुरा आणि चित्रपटातल्या अमरिशपुरीसारखा वगैरे दिसायला होता. तो कधीही कुठेही स्थिर राहिला नाही. काही कालावधी त्यानं आमच्या घरी काढला. आम्ही सगळीच भावंडं त्या वेळी लहान होतो. रात्रीची जेवणं झाली की औदुंबर आम्हाला गोष्टी सांगायचा. पुढे वाचा

किशोरकुमार आणि लीना चंदावरकर

किशोरकुमार आणि लीना चंदावरकर

किशोरकुमार हा माझा लहानपणापासूनच अतिशय आवडता गायक! लता मंगेशकर किंवा आशा भोसले अशा गायकांची गाणी गुणगुणायच्या ऐवजी मी मेल सिंगरचीच त्यातही किशोरकुमारची गाणी गुणगुणायची. त्याचं ‘जीवनसे भरी तेरी आँखे’ असो, की ‘आ चल के तुझे मै लेके चलॅू’ किंवा ‘बेकरार दिल तू गाये जा’  वा ‘ओ मेरे दिल के चैन’, किंवा ‘कोई होता जिसको अपना’ हे गाणं असो किंवा ‘ये राते ये मोसम नदी का किनारा’ हे ड्युएट सॉंग असो अशी शेकडो गाणी मला पाठ असायची. त्यातली काही गाणी तर आजही तोंडपाठ आहेत. खूप आनंदाच्या क्षणी किंवा अस्वस्थ मनःस्थितीत किशोरकुमारची गाणी धावून येतात. ती ऐकताना मी त्यात बुडून जाते.  पुढे वाचा

खिलते है गुल यहॉं....

खिलते है गुल यहॉं....

किशोरकुमार हिन्दी चित्रपटसृष्टीतला एक यशस्वी पार्श्‍वगायक, कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक अशा सगळ्याच क्षेत्रात त्यानं ठसा उमटवणारी मुशाफिरी केली. हिन्दीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमधून किशोर गायला. किशोरकुमारचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ साली मध्यप्रदेशमधल्या खांडवा या ठिकाणी एका बंगाली कुटुंबात झाला. त्याचं खरं नाव आभासकुमार गांगुली! फिल्म अभिनेता अशोककुमार, सतीदेवी, अनुपकुमार ही किशोरकुमारची भावंडं होती. अशोककुमारमुळेच किशोरकुमारला चित्रपटसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं. पण तो त्यात करियर करण्याबाबत तितकासा गंभीरही नव्हता. पुढे वाचा

आशीष

प्रकाशन व्यवसाय आशिश पाटकर - प्रथम

प्रकाशन व्यवसाय - आशिश पाटकर हा पदवीधर तरूण असून तो मनोविकास प्रकाशन या नामांकित प्रकाशनसंस्थेचं काम बघतो.
आशिशचे वडील अरविंद पाटकर हे कार्यकर्ते असून त्यांनी मनोविकास प्रकाशन ही संस्था ३० वर्षांपूर्वी सुरू केली. त्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू आशिशला घरातूनच मिळाले. आशिशची बोलताना एका प्रकाशन व्यवसायासाठी काय काय आवश्यक गोष्टी असतात त्याविषयी त्याने माहिती तर दिलीच पण अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो हे सांगितलं.
प्रकाशन व्यवसाय करणे म्हणजे अनेकविध विषयांवरच्या पुस्तकांची निर्मिती करणे आणि त्या पुस्तकाची विक्री घडवून आणणे होय. पुढे वाचा

तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर 

तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर - पुरूष उवाच दिवाळी 2020

रणबीरराज कपूर हा ‘द ग्रेटेस्ट शोमन ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत गाजला. तो एक कसदार अभिनेता, यशस्वी निर्माता, कुशल दिग्दर्शक आणि संगीताची उत्तम जाण असणारा दर्दी रसिक होता. 1971 साली भारत सरकारद्वारा पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आलं. तसंच 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं. ‘बरसात’, ‘आवारा’, ‘आह’, ‘अनाडी’, ‘श्री. 420’, ‘जागते रहो’, ‘जिस देशमे गंगा बहती है’, ‘संगम’,‘मेरा नाम जोकर’ यातल्या काही चित्रपटांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवलं गेलं, तर काही चित्रपटांच्या कलात्मकतेची समीक्षकांनीही भरभरून वाखाणणी केली. पुढे वाचा

Bertrand Arthur William Russell)

बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell) (18 May 1872 - 2 February 1970) - छंद दिवाळी 2018

एका गावात जे लोक स्वतःची दाढी करत नाहीत, त्यांची दाढी त्या गावातला एकमेव असलेला न्हावी करतो. आता याच गोष्टीकडे त्या गावाचा नियम म्हणून बघितलं तर मग तो न्हावी स्वतःची दाढी करतो की नाही? समजा, न्हावी स्वतःची दाढी करत नाही असं गृहीत धरलं तर वरच्या नियमाप्रमाणे तो स्वतःची दाढी करतो असं सिद्ध होतं. किंवा याउलट तो स्वतःची दाढी करतो असं गृहीत धरलं तर तो न्हावी त्याची स्वतःची दाढी करत नाही असं सिद्ध होतं. थोडक्यात आपण कुठल्याही गृहितकापासून सुरुवात केली तरी निष्कर्ष हे त्याच्या विरुद्धच जातात. या पॅरॉडॉक्स सोडवणं म्हणजे डोक्याला मस्त ताण देणारी गोष्ट आहे. पुढे वाचा