Movie Reviews

डोन्ट लूक अप

डोन्ट लूक अप

अमेरिकेत घडणारं कथानक दाखवलं असलं, तरी ते आपल्याही देशाला लागू पडतय  असं वाटावं अशी ही गोष्ट म्हणजे डोन्ट लूक अप हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट!अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्‍हर्सिटी मध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करणारी विद्यार्थिनी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेन्स) दूरवरचं निरीक्षण करू शकेल अशा दुर्बिणीने अंतरिक्षाचा अभ्यास करत असताना तिला एक धूमकेतू दिसतो. हा धूमकेतू बराच मोठा असतो. जवळजवळ 10 किमी व्‍यासाचा धूमकेतू वेगाने पृथ्वीकडे येताना तिला दिसतो. धूमकेतू हा उल्केसारखा असणारा एक खगोलशास्त्रीय पदार्थ असून ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. पुढे वाचा

रॉकेट बॉईज

रॉकेट बॉईज

भारताला स्वातंत्र्य  मिळण्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्यासाठी झगडणारे भारतीय, भारतातली विज्ञानाच्या क्षेत्रातली परिस्थिती, रामानुजन, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्‍ही. रामन, सत्येन बोस, शांतिस्वरूप भटनागर यासारखे जीनियस वैज्ञानिक. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आर्थिक आणि मानसिकरित्या उद्घवस्त झालेल्या भारतात रस्ते, रेल्वेमार्ग, शेती, शिक्षण, रोजगार, उद्योग, अशा अनेक गोष्टींवर काम करत असतानाच संशोधनावर/संशोधनकेंद्र स्थापन करण्यावर, खूप मोठा भर दिला आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं. पुढे वाचा

संपूर्ण जगभर अतीव उत्साहाची लहर पसरवणारा ‘स्पायडर मॅन: नो वे होम’!

संपूर्ण जगभर अतीव उत्साहाची लहर पसरवणारा ‘स्पायडर मॅन: नो वे होम’!

१६ डिसेंबर २०२१ या दिवशी संपूर्ण भारतात एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कोविडचे सर्व नियम पाळून सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रेक्षक त्यांचा लाडका नायक पडद्यावर कधी एकदा दिसतो याची आतुरतेने वाट पाहू लागले. या चित्रपटासाठी प्रेक्षक इतके अधीर झाले होते, की सगळ्या थिएटरमधली सगळ्या वेळांमधली तिकिटं लोकांनी आधीच आरक्षित करून ठेवली होती. पडद्यावर चित्रपटाची दृश्य दिसायला लागली आणि प्रेक्षकांच्या तोंडातून आश्चर्याचे, आनंदाचे चित्कार एकापाठोपाठ एक असे बाहेर पडू लागले.  तर, हा चित्रपट म्हणजे ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ आणि त्यातला नायक म्हणजे अर्थातच स्पायडर मॅन! पुढे वाचा

विश्व चषकाचा मानकरी - 83

विश्व चषकाचा मानकरी - 83

भारतीय लोकांचा आवडता खेळ क्रिकेट असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन असो, वा आपल्या घरातल्या टीव्‍हीवर असो, क्रिकेटची मॅच दोन्ही ठिकाणी बघताना तितकाच आनंद अनुभवायला मिळतो. कोणे एके काळी भारतीय क्रिकेटर्सना क्रिकेट विश्वात अगदीच नगण्य स्थान होतं. अशा वेळी 25 जून 1983 या दिवशी इंग्लडमधल्या लॉर्ड्सच्या मैदानावर दोन वेळा विश्व चषक मिळवलेल्या वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघावर ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय संघाने विश्व चषक जिंकला. समस्त भारतीयांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा तो क्षण होता. देशाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान होता कपिल देव! पुढे वाचा

होई मन सुध्द तुझं....

होई मन सुध्द तुझं....

मानसशास्त्र या विषयावर बोलणं सुरू असताना, अचानक माझ्या मैत्रिणीने एबीपी माझावर सुरू असलेल्या ‘होई मन सुध्द तुझं...’ या मराठी मालिकेविषयी बोलायला सुरुवात केली. मी याबाबत पूर्ण अनभिज्ञ होते, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून ती म्हणाली, मला ठाऊक आहे, तू मराठी मालिका बघत नाहीस, पण ही बघ. मी सांगतेय म्हणून नक्‍की बघ. नयन ही माझी खूप जवळची मैत्रीण, ती सांगते म्हणजे त्यात नक्‍कीच चांगलंच असणार असा विचार करून मी यू ट्यूबवरून या मालिकेचा एक एक एपिसोड बघायला सुरूवात केली आणि माझ्या अतिरेकी स्वभावानुसार बहुतांशी एपिसोड एका दमात बघितले.  पुढे वाचा