Movie Reviews

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

आज सकाळी स्वारगेटला जाऊन नागब्रह्म इथे मनसोक्त आप्पे खाल्ले आणि लगेचच एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बघितला. खरं तर मला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नाही. दोन ते तीन लोक सक्रिय असतात आणि बाकी सगळे निष्क्रिय! त्यात बघणारे हजारो, लाखो लोक दिल की धडकन थामके वगैरे बसलेले असतात. त्यापेक्षा मला खो-खो, लंगडी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फूटबॉल, कबड्डी वगैरे खेळ आवडतात. मला काय आवडतं किंवा आवडत नाही हे इथंच थांबवते. पण चित्रपट होता, क्रिकेटचा भारतीय सर्वात लोकप्रिय कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्यावरचा! त्यामुळे क्रिकेटवरचं भाष्य तोंडून सहजपणे निघून गेलं. पुढे वाचा

मिस्टर अँड मिसेस 55 

मिस्टर अँड मिसेस 55 

गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची गाणी लहानपणी अनेकदा ऐकली होती. औरंगाबादला शहागंज या भागातल्या ‘नरिमन’ नावाच्या दुकानातून माझ्या भावानं या चित्रपटाची एलपी रेकॉर्ड विकत आणली होती. यातली सगळीच गाणी एकसेएक होती. त्यातही ‘उधर तुम हसीं हो, इधर दिल जवॉं है’ हे गाणं मला इतकं आवडलं होतं की गाणी सुरु असताना त्या रेकॉर्डची पिन उचलून तेच तेच गाणं मी 50 वेळा तरी ऐकत असे. नंतर पुढे केव्हातरी कॉलेजला असताना हा चित्रपट दूरदर्शनवर बघितला तेव्हा तो खूपच आवडला. गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यावर चित्रित केलेलं हेच गाणं आठवणीत राहिलं. पुढे वाचा

दो बिघा जमीन 

दो बिघा जमीन 

सातत्यानं अनेक वर्षं गावात दुष्काळ पडल्यामुळे त्या गावातल्या शेतकर्‍यांची स्थिती अतिशय हलाखीची झालेली असते. त्या गावातला शंभू नावाचा अतिशय गरीब शेतकरी असतो. त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी केवळ दोन बिघा जमीन (जमीनीचा आकार मापन करण्याचं एक परिमाण, जसं एक गुंठा जमीन म्हणतो तसंच) आणि त्या जमिनीवर त्याचं छोटंसं खोपटंवजा घर असतं. त्याचे वृद्ध वडील, बायको - पारो आणि ८-९ वर्षांचा मुलगा - कन्हैया राहत असतात. पारोला दिवस गेलेले असतात. लग्नाला १० वर्षं उलटली असली तरी त्यांच्या नात्यातलं ताजेपण तसंच टिकून असतं. पाऊस पडला की सगळं सुरळीत होईल या आशेवर शंभूसहित सगळेच शेतकरी आतुरतेनं पावसाची वाट बघत असतात. पुढे वाचा