Movie Reviews

फोबिया

फोबिया

राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका असलेला ‘फोबिया’ हा चित्रपट नुकताच बघितला. मानसिक विकारावर आधारित असलेला हा चित्रपट अतिशय सुरेख असून राधिका आपटे हिनं अप्रतिम अभिनय केला आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा चित्रपट २७ मे २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सायकॉलॉजिकल थ्रिलर असं म्हणता येईल. काही जण या चित्रपटाची तुलना राम गोपाल वर्माच्या ‘कौन’ या चित्रपटाशी करतात. पण ‘कौन’ मध्ये चित्रपटातून नेमका प्रश्‍न लक्षात येण्याऐवजी उर्मिला मातोंडकरचं दिसणंच केवळ लक्षात राहिलं होतं. इथं मात्र तसं होत नाही. दिग्दर्शकाची प्रचंड मेहनत आणि राधिका आपटेनं अतिशय समजून केलेली भूमिका या चित्रपटात जाणवते. पुढे वाचा

कुम्बलंगी नाईट्स

कुम्बलंगी नाईट्स

डोळ्यांना तृप्त करणारा केरळचा वेगवेगळ्या छटांचा हिरवाकंच निसर्ग, रात्रीच्या वेळी हिर्‍यांसारखं चमचमणारं पाणी, मासे पकडण्याचं रेशमी भासणारं जाळं,  गावातलं साधंसुधं शांत जगणं आणि त्यात घडत जाणारी एक गोष्ट....कुम्बलंगी नावाच्या केरळमधल्या एका गावात आई-वडिलांशिवाय राहणारी साजी, बोनी, बॉबी आणि फ्रँकी नावाची चार भावंडं...वडिलांचा मृत्यू झालेला आणि आई मुलांना सोडून कधीचीच नन झालेली...या मुलांचं घर एका बेटावर असलेल्या कचराकुंडीतल्या  कचऱ्यासारखं...घराला ना प्लास्टर, ना एक वस्तू जागेवर...गावातले लोक या घराला आणि आसपास जमणारा कचरा आणि तिथे वावर असणार्‍या कुत्र्यांना बघून हसत असतात, या चारही मुलांना त पुढे वाचा

जोजी

जोजी

नुकताच म्हणजे ताजा ताजा ७ एप्रिल २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीश पोथन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘जोजी’ बघितला. कारण तुम्हाला ठाऊकच आहे, माझा आणि तुमचा आवडता फहाद फासिल ची भूमिका यात आहे. पॅनडॅमिकच्या काळात चित्रीत केलेला हा चित्रपट आहे हे विशेष. चित्रपटात अर्थातच केरळचा नयनरम्य निसर्ग आहे. रबराच्या बागा असलेलं एक सधन कुटुंब, तगडा, धिपाड्ड पण वृद्घ झालेला कुट्टीपन पिके नावाचा पिता आणि त्याची जयसन, जोमन आणि जोजी नावाची तीन मुलं... जयसनचा घटस्फोट झालेला आणि त्याचा कुमारवयीन मुलगा पपी त्याच्याबरोबरच त्याच मोठ्या बंगल्यात राहत असतो. जयसनला दारूचं व्‍यसन असतं. पुढे वाचा