पर्फेक्ट फॅमिली

पर्फेक्ट फॅमिली

पर्फेक्ट फॅमिली
पंकज त्रिपाठी निर्मित ‘पर्फेक्ट फॅमिली’ ही आठ भागांची मालिका नुकतीच यू-टयूबवर बघितली.
परिपूर्ण कुटुंब असल्याचं भासवणारं, तसा दिखावा करणारं एक कुटुंब यात आहे.
वडलांनी स्वकष्टाने उभारलेलं मिठाईचं दुकान/व्‍यवसाय, आई आज्ञाधारक सुगृहिणी
मुलगी लग्न झालेलं असलं, तरी माहेरीच राहत असून 
वडलांच्या व्‍यवसायात त्यांना मदत करतेय.
मुलगा आयटी कंपनीत कार्यरत, त्याची बायको घरात 
आपल्या दोन मुलांचं संगोपन करण्यात व्‍यस्त, 
घरातल्या कलहामुळे दानी या 10-12 वर्षांच्या मुलीला 
एन्झायटीचा पॅनिक ॲटक येतो. 
सुरुवातीला हा प्रॉब्लेमच नाही म्हणत कुटुंब सारवासारवी करतं, 
पण दानीच्या हातून शाळेतही या ॲटकमुळे घातक कृती होते. 
आता मात्र या कुटुंबाला शाळा त्याविषयी माहिती विचारते. 
हे कुटुंब नॉर्मल, आनंदी कुटुंब आहे हे सांगणारं प्रमाणपत्र त्यांनी 
थेरपिस्टकडून आणावं असं सांगते.
हे कुटुंब थेरपिस्टकडे जातं आणि इथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू होतो.
त्यांच्या या प्रवासात काय काय घडतं? त्यांचं जगणं बघून प्रत्येकाच्या आयुष्यात 
एखाद्या थेरपिस्ट ची गरज आहे का? 
लहानपणी घडलेले प्रसंग त्यांच्या भविष्यकाळावर कसे परिणाम करतात?
जगासमोर असलेल्या चेहऱ्यापेक्षा प्रत्येकजण खरा चेहरा जाणून घेऊ शकतो का?
अनेक प्रश्न आणि ती उत्तरांच्या प्रतीक्षेत उभी
हा प्रवास आहे, प्रत्येकाच्या भूतकाळाच्या ओझ्याचा, ताण-तणावाचा, 
त्यातून काढत असलेल्या वाटेचा, घुसमटीचा, 
मन मारून जगण्याची सवय केल्यामुळे शरीर आणि मन यावर होत असलेल्या परिणामांचा, 
महत्वाकांक्षेचा, दिखाव्‍याचा, संवादाच्या अभावातला, दुराव्‍याचा, 
भीतीचा, लहापणी बसलेल्या ट्रॉम्याचा, असुरक्षिततेचा, अस्तित्वाचा
या कुटुंबातल्या दानीपासून ते तिच्या आजोबांपर्यंतची प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी आहे,
दानी एक निमित्त ठरते आणि या पर्फेक्ट दिसणाऱ्या फॅमिलीचं खरं रूप आपल्यासमोर येतं
अशी पर्फेक्ट फॅमिली घराघरात आहे. या फॅमिलीला आपल्यासमोर आणून
पंकज त्रिपाठीने विचार करायला लावणारा, एक खूप चांगला अनुभव प्रेक्षकांना दिला आहे.
गुलशन देवय्या, गिरिजा ओक-गोडबोले, मनोज-सीमा पाहवा अशा कलाकारांनी आपल्या भूमिका 
अतिशय उत्तम साकारल्या आहेत.
ही मालिका प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत राहते, 
प्रत्येक पात्राबद्दल खूप तटस्थपणे विचार करायला भाग पाडते. 
जागतिकीकरण, जगण्यासाठीचा संघर्ष, वाढते ताण-तणाव, असुरक्षितता, नात्यांमधलं दुभंगलेपण
अशा अनेक मुद्दयांवर विचार करायला लावणारी 
आणि दिवसेंदिवस मानसिक आरोग्य या विषयाचं महत्व अधोरेखित करणारी,
त्याबद्दलचा अवरेनेस किती गरजेचा आहे हे सांगणारी पलक भामरी आणि अधिराज शर्मा यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेली
ही मालिका
जरूर जरूर बघायलाच हवी - पर्फेक्ट फॅमिली - यू-टयूबवर.
दीपा देशमुख
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.