परीक्षित

परीक्षित

कॅनव्हास वाचायला सुरुवातच केली आहे. कृतज्ञभावमध्ये तुम्ही माझे चक्क दोनदा आभार मानले आहेत. खरतर माझं योगदान काहीच नाही म्हणव इतक नगण्य असतांना केवळ तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून अस केलत. तुम्हीं म्हणजे ग्रेटच! smile emoticon 
अमोल पालेकर यांनी लिहलेली प्रस्तावना खरोखर डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे त्याचवेळी चित्रकलेबद्दल नवी जाणीव देणारी आणि आस्था निर्माण करणारीही आहे. प्रभाकर कोलते यांचा अभिप्राय म्हणजे कॅनव्हासचा छोटासा सारांशच वाटतो. बाबाचा अभिप्राय मस्तच. त्याची नेहमीची शैली, आवडती. त्याने अभिप्रायाच्या शेवटी व्यक्त केलेली आशा "कॅनव्हासमुळे चित्रांकडे आपण सजगतेने पाहू लागलो तर चीत्रास्वादी समूह तयार होईल आणि हे पुस्तक ते काम नक्कीच करेल" ती खरी ठरावी अशीच माझीही मनोमन इच्छा आहे. 
पुढे मनोगत - अच्युत सरांचे मनोगत वाचतांना सर्वप्रथम लक्षात राहिली ती कोणतेही पुस्तक लिहितांना आपणही खूप मेहनत घेतली पाहिजे,परफेक्शनसाठी प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. 
तुझ्या मनोगताची सुरुवात तर खूपच सुंदर झाली आहे. ती वाचतांना सामान्यवाचकाला वाटेल ही लेखिका, इतक मोठ पुस्तक लिहिणारी पण ही आपल्यातलीच एक! हिच्याही वाट्याला सुख दुखे आली, संघर्ष आला पण हिने पुस्तक लिहल ते त्या संघर्षावर नाही तर चित्रकला या अत्यंत सुंदर, संवेदनशील विषयावर! ही सुद्धा एक प्रेरणा नाही का? आपली दुखे आणि संघर्ष विसरून आपण जगातल्या सुंदर गोष्टी पाहू शकलो, इतरांना त्यांच्यातील सौंदर्य दाखवू शकलो तर खरंच काय बहार येईल. 
तुमचा  
परीक्षित