विजया चौहान

विजया चौहान

प्रिय दीपा,
अगदी जुनी पुराणी उपमा द्यायची झाली तर जंगलात पडलेले एखादे फुल तेथेच उमलते, आनंदाने हसते/डोलते/जगाकडे पाहते आणि संध्याकाळी आपल्या पाकळ्या मिटून घेते. 
आज असे मनात आले कारण ते दिवस आठवले जेंव्हा तू एक महत्वाचा निर्णय आयुष्यात घेतलास आणि छोट्या अपूर्वला घेऊन औरंगाबाद सोडून मुंबईत आलीस. तेथून पुढच्या तुझ्या प्रवासाची मी कधी जवळून तर कधी दुरून साक्षीदार राहिले आहे. 
तो प्रवास समोरच आहे. त्यातील खच-खळग्यांना/ओढे -नाल्यांना/छोट्या मोठ्या हल्ल्यांना     तोंड देत तू एका जिद्दीने पुढे जात राहिलीस, अश्रू पापणी च्या आत ठेवलेस , सर्व बदल हिमतीने स्वीकारत पुढे जात राहिलीस, विविध प्रयत्न, विविध fronts वर करीत राहिलीस आणि कुठेही तडजोड न करता, कष्ट/अनिश्चितता , काळजी हे सर्व कायम मनाच्या मागे टाकीत येतील ती आव्हाने स्वीकारत , एका आत्मसन्मानाने सामोरे जात तू आज या पायरीवर आहेस कि अच्युत सारख्या एका  सर्वमान्य /गाजलेल्या/ उत्कृष्ट्तेची मोहोर अनेक वेळा लाभलेल्या लेखकाबरोबर तुझे नाव लेखिका म्हणून झळकणार आहे. हे कर्तृत्व  सर्वस्वी तुझे आहे. तुझ्या मेह्नतीचे  ते फळ आहे. 
आज सकाळी तुझा कार्यक्रम चालू असताना हे सारे माझ्या मनात येत होत होते. 
अगदी मन:पूर्वक अभिनंदन दीपा,  तुला आता दिशा कळली आहे. रस्ता समोर दिसत आहे. अशीच चालत राहा . तू चालत असशील ती वाट   यशाचीच असणार आहे. 
तुला सर्व प्रकारे साथ देणा-या अपूर्व चेही  तेवढेच कौतुक आणि अभिनंदन . 
विजया.