जयदीप पाटील जळगाव

जयदीप पाटील जळगाव

दीपाताई म्हटलं म्हणजे मनमोकळ,सदैव आनंदी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व.माझ्यासारख्या नवख्या वाटसरूंना वाट दाखवणाऱ्या वाटाड्या. प्रत्येक गोष्टीत चांगलं बघण्याची दृष्टी मी दीपाताई कडून शिकलो .ताईंना व मला जोडणारा धागा म्हणजे " विज्ञान ". शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित जीनियस ही सिरीज जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा पहिल्यांदा वाचक व लेखक असं नातं जोडलं गेलं आणि वृद्धिंगत झालं शास्त्रज्ञांच्या जीवनाच्या विविध पैलूंना अतिशय सोप्या भाषेत ताईंनी मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल. मी माझ्या व्याख्यानांच्या निमित्ताने मग सर्व कडे जिनिअस मधल्या गोष्टी सांगू लागलो ,मुलांना पालकांना जीनियस पुस्तके वाचा हे सांगू लागलो. आणि शक्य त्या विद्यार्थ्यांना जीनियस पुस्तक भेट सुद्धा देऊ लागलो. हे करताना एक दृश्य शाबासकीची थाप दीपाताई आणि अच्युत गोडबोले सरांकडून मिळते आहे असं सारखं वाटत राहायचं . 
त्यावेळी विज्ञान संदर्भातले विविध प्रकल्प सुरू झाले होते आणि दीपाताई या प्रकल्पांची माहिती घेऊन बाईट्स ऑफ इंडियामध्ये माझ्यासारख्या खेडुत तरुणावर एक आर्टिकल लिहिले आणि त्यामुळे नोबेल फाउंडेशन आणि विज्ञानाचे काम जगभरात पोहोचले .दीपा ताईंनी विज्ञानाच्या सुरू असलेल्या या लहानशा कामाला आशीर्वाद दिला. नंतर नेहमी माझ्या लिखाणासाठी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. "तू जसा जेवतो ना दोन वेळा निदान एक वेळ तरी दिवसातून लिहत जा म्हणजे पुस्तक आपोआप पूर्ण होतात" हे त्यांचे वाक्य मला नेहमीच लिहायला प्रेरित करतात .माझ्यासारख्या अनेक तरुणांना उजेडात आणण्याचं काम या प्रज्ञासूर्य दीपा ताईंनी केलं. ताई तुमची नवीन पिढीला खूप खूप गरज आहे आणि मला सुद्धा. स्वतःची काळजी घ्या प्रकृतीला जपा आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या गोड आवाज आला जपा. आपल्या वाढदिवसाला आपणास निरामय आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
आपला मुलगा 
जयदीप