डॉ. संदीप देवरे 

डॉ. संदीप देवरे 

बरेच दिवस व्यवसायामुळे पुस्तक मागवून वाचायला सवड मिळाली नाही. 
धारपांवर लिहिलेल्या पुस्तकात आपलं नाव आणि अभिप्राय असणे 
यापरता आनंद दुसरा नाही,
दीपा देशमुख मॅडम ह्यांनी हा अनिर्वचनीय आनंद आम्हाला दिला 
याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत.
आम्हा वाचकांना जे धारपांबद्द्ल वाटते ते सर्व प्रेम त्यांनी 
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून या पुस्तकात उतरवले आहे 
सोबतच आजपर्यंत ठावूक नसलेल्या अनेक नव्या गोष्टी धारपांबद्दल कळाल्या!!
आमच्या सारखे अनेक वाचक आणि प्रेमी असतील 
ज्यांना धारपांना प्रत्यक्ष पाहता/भेटता आले नाही पण 
दीपा देशमुख यांनी ( आणि आमचा त्यात लाभलेला खारीचा वाटा) धारपांचे 
उभारलेले हे शब्दरूपी 'अक्षर' स्मृतीस्थळ, 
आमच्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची निरंतर आठवण करून देणार आहेत!! 
डॉ. संदीप देवरे