क्षितिज फाउंडेशन - Beyond the Horizon - Aspiring Women Award 2021
दीपा देशमुख. Deepa Deshmukh
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
ज्यांच्या लेखणीतून नवनवीन साहित्याची निर्मिती होते, त्यांच्या लेखनाने वाचक मंत्रमुग्ध होतात व समाजासाठी ज्यांचे लिखाण मार्गदर्शक ठरते. अशा लेखिका दीपा देशमुख मॅडम यांना क्षितिज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा या वर्षीचा साहित्य क्षेत्रातील 'अस्पायरिंग वूमन 2021' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.
उल्लेखनीय कार्य:-
लेखिका दीपा देशमुख या वाणिज्य शाखेतली पदवी, संगीत विशारद, सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक आहे. त्यांनी रॅशनल इमोटीव्ह बिहेविअरल थेरपी विषयातला कोर्स पूर्ण केला आहे. 'कॅनव्हास’ (चित्र -शिल्पकला यावर आधारित), 'सिम्फनी' (पाश्चिमात्य संगीतावर आधारित).'जिनिअस’ (जगप्रसिद्ध वैज्ञानिकांवर १२पुस्तिका), २०१५ मध्ये पिंपरी चिंचवड इथे झालेल्या सर्वेक्षणानानुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जिनिअस 'बेस्टसेलर'. 'भारतीय जिनिअस' (वैज्ञानिक, गणिती वास्तुशिल्प आणि तंत्रज्ञ - भाग १, २, आणि ३) 'तंत्रज्ञ जिनिअस' ( भाग १, २आणि ३). जिनिअस मालिका ऑडिओ स्वरूपात बुकगंगा वेबसाईटवर लेखिकेच्या आवाजात उपलब्ध आहेत. यांचे किशोरवयीन मुलांसाठी 'तुमचे आमचे सुपरहिरो' या मालिकेतले डॉ.अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकणी , डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ.ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. रवी बापट यांचंआयुष्य आणि कार्य यावर आधारित 7 पुस्तके प्रकाशित झाले आहेत .पाथफाईंडर्स (भाग १ आणि भाग २), नारायण धारप: एका गूढ, अद्भुत चित्तथरारक जगाची सफर यांसारखी पुस्तके प्रकाशित झाले आहेत . यांचा स्त्री प्रश्नांविषयी भाष्यकारण ‘गुजगोष्टी' कथासंग्रह ऍमेझॉन किंडलवर नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यांनी मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'चांदोबा' या मासिकाचा ४ वर्ष मराठीतून अनुवाद केला आहे. यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडिओवर लेखक आपल्या भेटीला आणि जिनिअस मालिकेतल्या २४ जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांवर कार्यक्रम प्रसारित झाला होता. 'मिळून साऱ्याजणी', 'अर्थपूर्ण', 'पुरुष उवाच' सारख्या अनेक मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून आणि विविध वर्तमान पत्रातून त्यांनी सातत्यानं लेखन केले. तसेच, शिक्षण, पर्यावरण, अपंगत्व आणि महिलांच्या प्रश्नांसंबंधी विविध विषयांवरच्या विशेषांकाचं संपादन केले आहे. त्यांनी मुलाखती, पुस्तिका परीक्षण केले आहे. त्याचप्रमाणे, मुसाफिर, मनात, नॅनोदय, थैमान चंगळवादाचे, गणिती, झपुर्झा भाग १, २आणि ३ आणि कॅनव्हास यापुस्तकांची मुखपृष्ठनिर्मिती ही त्यांनी केली आहे.
दीपा देशमुख या महात्मा गांधी सेवा संघ या अपंगत्वावर काम करणाऱ्या संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातल्या मासवण भागात आदिवासी सहज शिक्षण परिवार यासंस्थेत शिक्षण विभागप्रमुख म्हणून आदिवासींसाठी १५ गावात ७८ पाढ्यांवर काम केले आहे.
दीपा देशमुख यांचा नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्याबरोबर सक्रिय सहभाग होता. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने युवांसाठी सुरु असलेल्या 'निर्माण' आणि कुमारवायीन मुलांसाठी 'कुमारनिर्माण 'या उपक्रमात समन्वयक म्हणून कामाचा अनुभव आहे . 'प्रथम' या शिक्षणावर काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत कन्टेन्ट क्रिएटर आणि ट्रेनर म्हणून यांना कामाचा अनुभव आहे. यांनी नाटक, दिग्दर्शक आणि अभिवाचन अशा कार्यक्रमांचं सादरीकरण केले आहे. यांना संगीत, नाट्य, साहित्य आणि चित्रकला यात खोलवर रस आहे. यांचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात 'लिओनार्डो-दा-विंची' धडा समाविष्ट केला आहे. विज्ञान, या कला, साहित्य याविषयांवर महाराष्ट्रभर व्याख्यानाद्वारे प्रचार आणि प्रसार करतात. यांचा २०१४ यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे स्त्री- सक्षमीकरण बद्दल विशेष सन्मान केला. यांना २०१६ चा थिंक ग्लोबल फॉउंडेशन या संस्थेकडून कला, विज्ञान आणि सामाजिक कार्ययातल्या योगदानाबद्दल स्व. सदाशिवअमरापूरकर गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे . तसेच ,२०१७ सालचा स्त्री- सक्षमीकरणाबद्दल ज्ञानेश्वर मुळे फ्रेंड्स पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१८ साली शेवगाव इथल्या बाल-कुमार साहित्य संमेलनात 'वैज्ञानिक येति घरा' विषयावर वक्ता म्हणून सहभाग घेतला होता. २०१८ साली आंबेजोगाई इथे संपन्न झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनात उदघाटक म्हणून सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला. १४ नोव्हेंबर२०१९, बालदिनाचं औचित्य साधून बालगंधर्व पुणे इथे अ.भा. बालकुमार साहित्यसंस्था, पुणे यांच्यातर्फे विज्ञान विभागातला पुरस्कार यांच्या 'तंत्रज्ञ जिनिअस' ला प्राप्त झाला. तसेच, २०२० सालचा रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण तर्फे साहित्यातील योगदानाबद्दल विशेष गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.