संध्या चारूशिला

संध्या चारूशिला

मैत्रीचे सुर.....🎸🎹🎷🎶🎼💕मैत्री .....क्षणार्धात हि होते आणि काहीवेळा वर्षानुवर्षे सरतात.काही वेळा एकमेकांचे सुर आवडी निवडी पटकन जुळून येतात आणि मैत्रीची सुरेल धुन कानामधे वाजायला लागते आणि एक आनामिक ओढ लागल्यासारखे आपण त्याकडे आकर्षित होऊ लागतो.पहिल्या पासून च मी मैत्रीच्या जास्त प्रेमात पडते.जिथे गाँसिपींग नसतं,हेवेदावे नसतात तिथे पटकन माझे सुर जुळतात.ते ही अनंत काळासाठी..... असो..
दीपाताई.... ( #सुप्रसिद्ध #जिनियस #लेखिका)  लेखिका, समाजसेविका आणि बऱ्याच पुरस्काराच्या अलंकारांनी नटलेली, पण त्याचा खूप गवगवा न करता आपले पाय सतत जमिनीवर ठेऊन सर्व मित्र मैत्रिणींना फावल्या वेळेत भेटून निवांत गप्पांमधे रमणारी एक छान मैत्रीण...नव्यानेच आयुष्यात आली पण मनात खोलवर उतरलेली.....
सिंफनी चा प्रकाशन सोहळा होऊन बरेच दिवस झाले.पण पुस्तक अजून हाती लागत नव्हतं.बऱ्याच वेळा आमच्या भेटी ची काही कारणाने चुकामुक होत होत,आम्ही आजचा योग साधून घेतला.कारण पाश्चात्य संगितावर आधारित या पुस्तकाने व त्यातल्या #Q-#R #कोड च्या अभिनव प्रयोगाने वाचण्याची उत्सुकता जास्त वाढली होती.कोणते ही पुस्तक लेखक-लेखिकेच्या स्वाक्षरी सहीत,त्यांच्या हातून स्विकारणं हे खूप आनंददायी असतं. माझ्या अगोदर येऊन माझी वाट पहात बसणारी ही छोटीशी मैत्रीण ,जी आपल्या सिद्ध हस्त लेखणीने अनेकांच्या ह्रुदयावर राज्य करते...आज माझी वाट पहात होती.अंगावर जरा मुठभर अजून मांस चढलं.काय करणार पुण्याचं ट्रँफिक..वेळेत पोहचू देत च नाही. असो पण इथे मैत्री माझी वाट पहात होती.डीश ची आँर्डर देऊन पहिल्यांदा पुस्तक हातात घेतलं.नवीन कोऱ्या #सिंफनी चा वास ,देखणं रुप, त्यावर संगीता सारखीच सुरेल दीपाताई ची, दीपाच्या दीर्घ स्वरातील स्वाक्षरी...अहा..हा..स्वारी एकदम खूष...पटकन वेटर कडून फोटो काढून घेतला(फोटोची हौस भारी)...आणि चविष्ट(😜) नाश्त्यासोबत छान गप्पा रंगल्या.

बोलण्यातून,गप्पांमधून बऱ्याचशा आवडी-निवडी काही वेळा जमून येतात.माझ्या छोट्याशा घरबसल्या उद्योगामधे साड्यांचं (mostly cotton) Collection असतं.ती पण काँटन प्रेमी आहे..आणि साड्या म्हंटलं की बायकांचा विक पाँईंट...किती ही असल्या तरी कमीच...आणि या लोकांना रोजचे कार्यक्रम असतात त्यांमुळे भरपूर स्टाँक लागतो.मग माझ्या collection मधील काही ती खरेदी करते.अशावेळी साड्यांची देवाण घेवाण पण होते, गप्पां पण होतात, व चहा -नाश्त्यासोबत वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी पण मिळते. 
असं हे मैत्रीचं नातं भेटण्यातून, बोलण्यातून जास्त प्रगल्भ होत जातं. एकदा का हे निरागस सुर गवसले की आठवणींचे क्यु-आर कोड मधे मधे टाकत रहायचे...आपोआप मैत्रीची ती सुरेल सिंफनी अनुभवायला मिळते...आयुष्य जणू  संगितमय होतं.....।।।
धन्यवाद दीपाताई , वाचून Review नक्की कळवेन..👍👍
पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा..।। 💐
                                              संध्या..।।🌹