अभिजीत, वर्धा
Hii दीपा मॅम
माझं " जग बदलणारे ग्रंथ" नुकतंच वाचून पूर्ण झालं आणि मला खूप खूप आवडलं.
यातली सात पुस्तकं मी वाचलेली होती, याशिवाय इतर पुस्तकाबद्दल नव्याने कळलं. इतक्या वेगवेगळ्या विषयाबद्दल एकत्र वाचण्याची गंमतही अनुभवता आली. वाचण्याच्या प्रवासात त्या विषयात झालेले बदल, नवीन कल्पना काळानुसार कश्या प्रकारे बदलल्या गेल्या व धर्म कसा निरर्थक, कालबाह्य झाल्याची जाणीव होत गेली..
"डायलॉग" लिहितांना गॅलिलिओ ने केलेली कसरत तर भन्नाटच वाटली. "थियरी ऑफ रीलेटीव्हीटी" वर इतक्या सोप्या भाषेत विश्लेषण माझ्या वाचनात आलं नाही..विक्षिप्त विब्लेन, स्तिग्लिट, चोम्स्की, पिकेटी, लिनियस खूप आवडले..
मॅम, या पुस्तकाचा दुसरा भाग नक्की लिहा👍