आजची एक ग्रेट भेट… 🌿📚
आजची एक ग्रेट भेट… 🌿📚
प्रसिद्ध लेखिका दीपा ताई देशमुख यांची आज सहकुटुंब भेट घेण्याचा सुंदर योग आला.
मागील एक दशकाहून अधिक काळापासून दीपाताई आणि महामानव बाबा आमटे संस्था यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध..
नेहमीप्रमाणे आजही ताई सोबत मनमोकळा संवाद, झाला
विचारांची देवाणघेवाण आणि आपुलकीची ऊब अनुभवायला मिळाली. 💐
नुकतेच मनोविकास प्रकाशन मार्फत प्रसिद्ध झालेली दीपाताईंची तीन पुस्तके —
📖 दिग्गज – १
📖 दिग्गज – २
📖 मर्डर मिस्ट्री
ही पुस्तके ताईंनी आम्हा–उभयतांना सदिच्छा भेट म्हणून दिली.
दिग्गज – १ व २ या पुस्तकांत
संगीत, साहित्य, कला, विज्ञान, गणित, स्थापत्य, राजकारण व समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील
जानेवारी ते डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या प्रतिभासंपन्न व्यक्तींचा अद्भुत कार्यप्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे.
तर “मर्डर मिस्ट्री” या पुस्तकातून
माणसातील अंधाऱ्या बाजूचे दर्शन घडवणाऱ्या सत्यकथा व सत्य घटनांचे थरारक वास्तव उलगडते.
अशा संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखनासाठी
दीपा ताई देशमुख यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि कृतज्ञता! 🙏✨
छायाचित्रात.. सौ शुभांगी, ज्ञानदा आणि सृष्टी..