जयदीप पाटील 

जयदीप पाटील 

आदरणीय दीपाताई वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
 दीपा देशमुख साहित्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. भारतीय जीनियस, विदेशी जीनियस ,तंत्रज्ञ जीनियस या मालिकेमुळे खरंतर दीपाताईंची परिचय झाला. मात्र या परिचयाचे रूपांतर आई मुलासारख्या सुंदर नात्यात झाले.आमच्यासारख्या सामाजिक व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना जोडणारा एक मौल्यवान धागा म्हणून आम्ही दीपाताई कडे पाहतो.दीपाताई आपलं जसं जसं वय वाढत आहे तसं तसं आपल्यातल लहान मुल जागं होत आहे. आपल्यातला उत्साह कोणतेही काम करण्याचं कुतूहल हे अगदी निरागस लहान मुलासारखं असतं. विविध विषयांवरचा व्यासंग आणि कोणतेही काम परफेक्ट पद्धतीने करण्याची आवड यामुळे दीपाताई आम्हाला खूप आवडतात.
                   नोबेल फाउंडेशनच्या सर्वच उपक्रमांना मार्गदर्शक म्हणून दीपाताई आम्हाला लाभलेल्या आहेत हे आमच्यासाठी भाग्यच समजतो.
दीपाताई निसर्गशक्ती आपल्याला उदंड आयुष्य देवो यासोबतच आपल्या लेखणीतून जगभरातील वेगवेगळ्या ज्ञान मराठी वाचकांना मिळो या जन्मदिनी शुभेच्छा !!
जयदीप पाटील 
नोबेल फाउंडेशन जळगाव