#डायरेक्टर्स 

#डायरेक्टर्स 

#डायरेक्टर्स 
आताच अनेक अडचणींवर मात करून दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशित  #डायरेक्टर्स हे अप्रतिम असं पुस्तक वाचलं.  मुख्य अडचण म्हणजे मोबाईल. तो वाजला तरी त्रास होतो आणि का नाही वाजला म्हणूनही त्रास होतो. त्यावर मात केली तर इतर कामे मध्ये येत होतीच. पण आज ते पूर्ण केलं.
आपण सिनेमाच मेकिंग बघतो तसंच हे पुस्तक तुम्हाला वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटाची निर्मिती कशी झाली , अभिनेते त्यात कसे आले, चित्रीकरण करताना काय गमती झाल्या, किती अडचणीत आल्या हे सगळं अतिशय सहजपणे सांगत.
हे पुस्तक वाचत असताना मीच फ्लॅश बॅक मध्ये गेलो. व्ही शांताराम , राजकपूर, ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट आठवले.
सत्यजित रे, श्याम बेनेगल, बिमल राय, गुरुदत्त नव्याने शिकता आले. किशोर कुमार, विजय आनंद,  एम एस सत्थु यांचं व्यक्तिचित्रण डोळ्यासमोर आलं.
व्ही शांताराम यांच्या शेजारी, दो आखे बारा हात, नवरंग, पिंजरा तर सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली, अपुर संसार, सतरंज के खिलाडी ह्या सगळ्या चित्रपट निर्मिती ची प्रकिया कळत गेली.
मॉर्निंग मॅटनी ला पाहिलेला बरसात, अनाडी, संगम , श्री 420, बाजी अशा अनेक चित्रपटांसोबत  च्या आठवणी जाग्या झाल्या.
श्याम बेनेगल यांचे चित्रपट अस्वस्थ करून सोडायचे. अंकुर, मंथन, निशांत, भूमिका, मंडी आणि बलराज सहानी यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केलेला #गर्महवा. हे चित्रपट आठवले तरी मन सुन्न होतं.
दीपा, हे पुस्तक तू मला अर्पण केलं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या सुरेख पुस्तकात आपण एका पानावर लिखित स्वरूपात आहोत , अजून काय हवं?
धनंजय सरदेशपांडे.