संध्या नलावडे
काल संध्याकाळी #अंबर #हाँल #कर्वे #रोड, #पुणे येथे प्रसिद्ध मराठी संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते #सिंफनी प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला. मनोविकास प्रकाशित,पुस्तक पेठ आयोजित या दिमाखदार कार्यक्रमा मध्ये विख्यात लेखक अच्युत गोडबोले,दीपा देशमुख यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली एक सुरेल #सिंफनी (पाश्चात्य संगीताची एक सुरेली सफर) प्रकाशनाच्या द्वारे वाचकांच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. .....संजय जोशी (पुस्तक पेठ) यांचे हलक्या फुलक्या विनोदां सोबत चे निवेदन व सर्वांच्या स्वागताने कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात झाली. आपली मैत्रीण व आवडती लेखिका दीपाताई ने आपल्या #सिंफनी चा लेखन प्रवास थोडक्यात उलघडला.त्या मागचे दोघांचे हाडाचे कष्ट,विविध पुस्तकांचा अभ्यास आणि माहिती सर्वांसमोर मांडली.संगीताला खरं तर देश-विदेशांच्या सीमा नसतात च मुळी...त्याला फक्त हवा असतो एक रसिक श्रोता.भारतीय संगीत ,संगीतकार यांना आपण ऐकतो,वाचतो.पण पाश्चिमात्य संगीत ऐकताना त्याची जडण- घडण,त्यामागचा इतिहास आपण जाणून घेतच नाही.कारण एक गाणं तयार होत असताना त्यामागे कितीतरी जणांचा सहभाग असतो.आता त्या प्रतिभावंत कलाकारांचे अनुभव, त्या मागचा रंजक इतिहास ,त्यांचे आयुष्य हे सगळं आपल्या ला सिंफनी मधे एकत्र वाचायला मिळेल.मायकेल जँक्सन, बिथोवन, मीरीयम मकेबा, प्रिस्ले पासून अगदी मँडोना, जस्टीन बेवर पर्यंत च्या या कलाकारांना आपल्याला वाचता,जाणून घेता येईल.त्याच बरोबर या पुस्तकामधील एक विशेष नाविण्यपूर्ण कल्पना म्हणजे #क्यु #आर #कोड. हा आगळा वेगळा यशस्वी प्रयत्न म्हणजे त्या कलाकराची तुम्ही माहिती वाचत असतानाच त्याची काही विशेष गाणी ही तुम्हाला त्या #QR -#code मुळे त्या लिंकवर जाऊन ऐकता येतील. आणि हि आयडिया ची कल्पना खरं अपूर्व देशमुख (दीपाताई चा चिरंजीव) याच्या डोक्यात आली व त्याने ती प्रात्यक्षिका सहीत प्रत्यक्षात उतरवून दाखवली.त्या बद्दल त्याचं मनापासून कौतुक करावसं वाटलं.कारण नवीन पिढीचा हि या मधे महत्त्वाचा सहभाग आहे. दीपा ताई ची लेखणी खरंच कायम बरसत असते.एक अभिजात लेखिका म्हणून तिचा उल्लेख करत असताना ,ती एक छान मैत्रीण ,यशस्वी आई म्हणून अभिमान वाटतो.
नंतर अच्युत सरांनी आपल्यातल्या संगीत रसिक लेखकाला बोलतं केलं.संगीत किंवा गाणं हे कधीच समजून घेऊ नये...ते काय गणित आहे का.. समजून घ्यायला..? जे कानाला मंत्रमुग्ध करेल व ह्रुदयांला भिडेल ...तेच खरं संगीत...मग ते पाश्चात्य असो की भारतीय.... अच्युत सरांच्या या बोलण्यातुन एक गाढा अभ्यासक, ज्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल आणि जिज्ञासा आहे,तो डोकावत होता. मुसाफिर,गणिती, झपुर्झा, किमयागार बोर्डरुम इ. सारख्या निरनिराळ्या विषयांच्या अभ्यास पुर्ण लिखाणानंतर त्यांनी पाश्चात्य संगीत या विषयावर लिखाण करण्यास सुरवात केली.व एक सहलेखिका म्हणून दीपाताई ने घेतलेल्या प्रयत्नांचे ते वारंवार कौतुक करत होते.या दोघांच्या अथक प्रयत्नातून, शब्दांच्या तालबद्ध रचनेतून तयार झालेली #सिंफनी माहिती बरोबरच वाचकांचे मन पण रिझवेल यात शंका नाही.त्याच बरोबर अच्युत सरांनी सांगितल्या प्रमाणे या पुस्तकातून आपल्याला गाजलेली हिंदी गाणी, कोणत्या पाश्चात्य संगीतावरुन प्रभावित झाली आहेत, त्याची ठरावीक गाण्यांची यादी ही या पुस्तकात पहायला मिळेल.म्हणजे हा संगीत मिलाफ वाचण्यासाठी नक्कीच रंजक असेल.
उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत चालला होता.त्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या अध्यक्षीय भाषणाने अजूनच रंगत आली. वेगवेगळ्या गीतांना-कवितांना तालबद्ध करताना होणारे विनोद ,काही घटना त्यांनी खूबीने आम्हा श्रोत्यांसमोर मांडल्या.सिंफनी चे कौतुक करताना #आपल्या #कायम #संग्रही #ठेवावे #असे #पुस्तक ,#एवढा #संगीताचा #गाढा #अभ्यास #या #सिंफनी #मधे #दडलेला #आहे, असं नमुद केलं.
असा हा सिंफनी चा आणि आमच्या मैत्रीणीचा कौतुक सोहळा पहाण्या साठी बारामती हून पण आमचे खास संगीत रसिक आर्याबागकर मित्र डॉ. संजीवदा व डॉ. भास्कर सर आवर्जून हजर होते.त्याबरोबर आम्ही सगळ्या आर्याबाग मैत्रीणी आसावरी, सीमा, मिनाक्षी, दर्शना,नेत्राताई, शुभांगी या कौतुक सोहळ्यात सहभागी झालो होतो.सर्वांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.मग त्या बरोबर पुस्कांची खरेदी, फोटोसेशन आलंच..या सर्वांचा आनंद घेत....दीपाताई व अच्युत सरांना शुभेच्छा देत आम्ही सर्वांनी त्यांचा निरोप घेतला.
दोघांचे मनापासून अभिनंदन..।।🌹🌹
#संध्या..।। 🌹 21 जुलै 2018