अतुल खेरडे

अतुल खेरडे

"माझा मुलगा टीव्ही फार पाहतो. ते कमी कसे करावे?" परवा गोव्याला झालेल्या कार्यक्रमांत एका आईने विचारले तेव्हां मला सुद्धा गम्मत वाटत होती. म्हलं "अहो टीव्ही कमी करणे असे  कुठे उद्दिष्ट असते का?  टीव्ही पहायचा नाही तर त्याने करायचे काय ते सांगा ना!!  काय करू नये ह्याची मोठ्ठी यादी असते आपल्याकडे - पण काय करावे हे कुठे सांगतो आपण मुलांना

या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जीनियस नावाची ७२ जग बदलणाऱ्या युगप्रवर्तक व्यक्तीची मालिका सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख घेऊन येत आहेत. या ७२ पैकी पहिले १२ वैज्ञानिक येत्या दिवाळीत वाचकांच्या भेटीसाठी मनोविकास प्रकाशनातर्फे येत आहेत. सध्या आगावू बुकिंग केल्यास अतिशय मोठी सूट प्रकाशकांनी जाहीर केली आहे.

खरं म्हणजे दहावीपर्यंतच्या मुलांच्या (कॉलेज मधल्यासुद्धा) अभ्यासक्रमात असो वा त्या नंतर कुठल्याही वाचनवेड्यांसाठी रोजच्या जीवनातील उपयोगावर आधारित अनेक शोधांची आणि शास्त्रज्ञांची माहिती मिळाली तर ती  आवडते. पण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रश्न-व-अचूक-उत्तर ह्या format मध्ये व पाठांतर करण्यामध्ये एवढी ढोरमेहनत करावी लागते कि सारी रंजकता मरून जाते आणि त्या विषयांमधला रस निघून जातो. पण अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी नेमका हाच विचार करून जीनियस ची मांडणी केली आहे.

जीनियसच्या पुस्तकांमधून ग्यलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, लुई पाश्चर, रोबर्ट कोख, अलेक्झांदर फ्लेमिंग, मेरी क्युरी, लीझ माइटनर, ओपेन्हायमर आणि फाइनमन  अशा १२ शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांबद्दल  आणि आयुष्याबद्दल सखोल, रंजक आणि सुलभ पद्धतीने मांडणी केलेली आहे. किंबहुना शिक्षकांनी देखील ते ते विषय वर्गात शिकवायच्या आधी ही पुस्तके चाळली तर त्यांना  शिकवताना उपयोग होईल. खरं म्हणजे जीनियसच्या १२ शास्त्रज्ञांची माहिती व त्यांच्या शोधांची माहिती मिळून एक मोठ्ठा ग्रंथ होऊ शकला असता – पण तस न करता  अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी प्रत्येक शास्त्रज्ञ त्याच्या कार्यासह स्वतंत्रपणे उलगडला आहे.

आजकालच्या पिढीला फार जास्त ज्ञान पाजून चालत नाही. पण  नव्या पिढीला सकस माहिती नक्कीच आवडते हे ह्या दोघांनी लक्षांत घेतले. व त्यातून ह्या पुस्तकांचा format तयार झाला. “वाचन संस्कृती कमी झाली आहे” या तक्रारीत न पडता बदललेल्या परिस्थितीत जीनियस-पुस्तक संचाचा रुपात प्रभावी इलाज केला आहे म्हटले तरी चालेल. त्यांनी लिहिलेला जीनियस संच वाचनीय आहेच पण  संग्रहाय्य देखील आहे.

एखाद्या शास्त्रज्ञाविषयी मांडणी करताना त्याचे/तिचे बालपण कौटुंबिक पार्श्वभूमी जडणघडणवैचारिकतेकडे असलेला कल शोध कसा लावलाजगासमोर  यायला किती वेळ गेला, कोणते अडथळे पार करावे लागले  व नंतर जगांत त्या सर्व शोधांचा कसा परिणाम व उपयोग होतोय अश्या रीतीने सलगपणे सखोल अभ्यासपूर्ण  माहिती येते. भाषा देखील रंजक व सोपी असल्याने वाचकांशी साधलेला संवाद ओघळणार्या मधाच्या तलम धारेसारखा विनासायास होत राहतो. लहान लहान प्रसंगातून त्या शास्त्रज्ञाचे जीवन उलगडत जाते. जीनियस म्हणजे त्याच्या जीवनातील केवळ बातम्या नाहीत, तर त्याचा वैचारिक पोत कसा घडत गेला ह्याची उत्तम मीमांसा देखील आहे.

खरं म्हणजे शास्त्रज्ञांची माहिती लहान वयांत मुलांना जड होईल काअसे प्रश्न पालकांच्या मनात कधी कधी येतात. उदा मेरी क्युरी ने लावलेले रसायनशास्त्रातील शोध ह्या मुलांना झेपतील का मुलांच्या मानसिक जडणघडणीत प्रस्थापित अधिकाराशी मतभेद” हि एक मोठी पायरी  असते. शिक्षकांनी दिलेले डोके न लावता” पाठ करायचेव परीक्षेत घोकायचे एवढेच तंत्र त्यांच्यावर सगळे सांगतात. मग नवीन विचार आला तरी त्याचे करायचे कायअशी कोंडी होते – व शेवटी कंटाळून मुले अभ्यासात तरी नाविन्याचा नाद सोडून देतात. पण जोपर्यंत प्रस्थापित गोष्टींवर प्रश्न विचारले जात नाहीततोपर्यंत नवीन गोष्टी उद्भवणार कशापण ह्या पुस्तकांमध्ये तर सर्व शास्त्रज्ञ असे आहेत कि ज्यांनी त्या त्या विषयाला कलाटणी दिलेली आहे. एखाद्या अक्ख्या विषयावर जी मंडळी प्रभाव टाकू शकली ती सुद्धा कधीतरी आपल्यासारखीच लहान मुले होतीत्यांना देखील आपल्यासारखेच प्रश्न पडत होते, हे विचारविश्वच मोठे प्रेरणादायी आहे. ह्या शास्त्रज्ञांच्या परिचयातून मुलांना ते प्रश्न विचारण्याचे बळ नक्कीच मिळेल.

कितीतरी पालकांना हि पुस्तके पाहिल्यावर “मी लहान असतांना मराठी अशी पुस्तके का नव्हती” अस प्रश्न पडण्याची शक्यता आहे. आजही ह्या पातळीवरील अशी पुस्तके तुरळक उपलब्ध असल्याने प्रामुख्याने मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या  वैचारिक घडणीत बर्याच वेळा एक माहितीची पोकळी जाणवत राहते. ज्ञानाच्या संकल्पनांचे आकलन हे केवळ बुद्धी वर अवलंबून असल्यामुळे ग्रामीण भागातील किंवा प्रामुख्याने मराठी भाषेतून शिकलेल्या मुलांचे ज्ञान शहरी (इंग्रजीत शिकलेल्या) मुलांच्या तोडीस तोड असते. पण ते ज्ञान मांडतांना त्यांच्याकडे माहितीचा अभाव असल्याने एक पाउल मागेच राहण्याची वृत्ती निर्माण होते. ती सुद्धा ह्या जीनियसमधून भरून निघेल.

अच्युत गोडबोले व दीपा देशमुख यांनी हा उपक्रम जो सुरु केला आहे त्याचे लवकरच इतर भाषांमध्ये भाषांतर होईल कात्या दिशेने हे नक्कीच पहिले पाउल म्हले पाहिजे. 

अतुल खेरडे